बारामतीत एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या वतीने
हात धुवा दिनानिमित्त प्रात्यक्षिक व मार्गदर्शन
बारामती, ता. 15- जागतिक हात धुवा दिवसाचे औचित्य साधून एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने आज विद्यार्थ्यांसाठी हात धुवा प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.
हात व्यवस्थित न धुण्याने अनेक आजारांना आमंत्रण दिले जाते, जेवताना, स्वच्छतागृहातून बाहेर पडल्यानंतर तसेच बाहेरून आल्यावर, काही काम केल्यानंतर हात स्वच्छ न धुतल्याने अनेक आजारांना मुले बळी पडतात, ही बाब विचारात घेत फोरमच्या वतीने हा उपक्रम राबविला गेले.
शहरातील शारदा प्रांगणातील नगरपालिका शाळा क्रमांक पाच व सहा मधील विद्यार्थ्यांसाठी हे प्रात्यक्षिक आयोजित केले गेले. या प्रसंगी फोरमच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना शास्त्रशुध्द पध्दतीने हात कसे धुतले जातात, याचे प्रात्यक्षिक करुन दाखविले.
त्या नंतर विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे याचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. या पुढील काळात शास्त्रशुध्द पध्दतीनेच हात धुण्यासह इतरांचेही आम्ही प्रबोधन करुन असे विद्यार्थ्यांनी या प्रसंगी नमूद केले.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील, शाळा क्रमांक पाचचे मुख्याध्यापक देवीदास ढोले व शाळा क्रमांक सहाचे मुख्याध्यापक यशवंत गावित यांच्यासह फोरमचे सदस्य उपस्थित होते.
No comments:
Post a Comment