बारामती तालुका ग्रामीणचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांची मुख्यालयात बदली.. बारामती : बारामती तालुका ग्रामीणचे पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश ढवाण यांची मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी त्यांच्या बदलीचा आदेश काढला आहे. तालुका पोलिस ठाण्यात तात्पुरता पदभार पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्याकडे देण्यात आला आहे.पोलिस निरीक्षक ढवाण यांच्यासंबंधी गंभीर
स्वरुपाच्या तक्रारी करण्यात आल्याचे बोलले जात होते. त्याची दखल घेत ही बदली करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.बारामती शहरात
उलट सुलट चर्चेला उधाण आले होते. जिल्हा पोलिस अधिक्षकांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, ४ ऑक्टोबरला जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाची बैठक झाली. त्यात ढवाण यांची नियंत्रण कक्षात बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला.ढवाण यांनी बदली झालेल्या ठिकाणी त्वरीत हजर होवून तसा अहवाल सादर करण्याचेही आदेश जिल्हा पोलिस अधिक्षकांनी दिले आहेत.ढवाण हे २४ सप्टेंबरपासून अर्जित रजेवर आहेत. त्यांचा पदभार पुणे ग्रामीणच्या
डायल ११२ चे पोलिस निरीक्षक प्रभाकर
मोरे यांच्याकडे सोपविण्यात आला होता.पुढील आदेशापर्यंत तो मोरे यांच्याकडेच राहणार असल्याचे पोलिस अधिक्षकांच्या पत्रात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment