बारामतीत पोलीस अधिकाऱ्यांना भलताच भरलाय चळ!. प्रकरण अंगाशी आले की बदली करून काढतात पळ!! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, October 3, 2022

बारामतीत पोलीस अधिकाऱ्यांना भलताच भरलाय चळ!. प्रकरण अंगाशी आले की बदली करून काढतात पळ!!

बारामतीत पोलीस अधिकाऱ्यांना भलताच भरलाय चळ!. प्रकरण अंगाशी आले की बदली करून काढतात पळ!!                                                                                                         बारामती:- बारामतीत काही पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना नक्की होतंय तरी काय?चांगली नोकरी असताना नको त्या मार्गाला जाऊन नको ते प्रकरण करून बसतात आणि प्रकरण अंगाशी आले की, तात्काळ बदली किंवा रजेवर जातात असे एक नव्हे तर तर अनेक घटना घडल्या तेही बारामती सारख्या गावात ज्या बारामतीचे नाव विकासाच्या दृष्टीने भारतभर गाजत असून या बारामतीत माजी उपमुख्यमंत्री अजितदादांनी पोलीस मुख्यालय आणले तर काही भागात प्रशस्त असे पोलीस स्टेशन बांधले आहे असे असताना मात्र जो अधिकारी बारामतीत येतो तो थोडा दिवस चांगले काम करतो मात्र काही एक अधिकारी आपले रंग दाखवायला सुरुवात करतो यामध्ये प्रामुख्याने सर्वात जास्त महिलांशी गैरवर्तन केल्याचे प्रकार उघडकीस आले आहे हे सर्वांनाच माहीत आहे, असे एक झाले की दुसरी घटना घडते तोपर्यंत लगेच तिसरी घटना असे अनेक घटना घडत चालल्याने बारामतीत नक्की चाललंय काय अशी चर्चा रंगू लागली असतानाच पुन्हा एका पोलीस अधिकारी यांनी महिलेला अशील मेसेज पाठविल्याची चर्चा रंगू लागली आहे, याबाबत समजलेली व चर्चेत आलेली माहिती अशी की,''तुझा होकार आहे की नाही, ते सांग. शेवटचं विचारतोय' बारामतीच्या पोलिस अधिकाऱ्याचा महिलेला अश्लील मेसेज
या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने संबंधित महिलेला
तिच्या व्हॉटस अॅपवर अश्लील मेसेज टाकून तिला 'आय लव्ह यू' म्हटल्याचे स्क्रीनशॉट काही जणांकडे आहेत. बारामती येथील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने एका महिलेला तिच्या
व्हॉटस अॅपवर अश्लील मेसेज पाठविल्यानंतर आता वरिष्ठांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने
संबंधित महिलेला तिच्या व्हॉटस अॅपवर अश्लील मेसेज टाकून तिला ‘आय लव्ह यू' म्हटल्याचे स्क्रीनशॉट काही जणांकडे आहेत. या बाबत आता वरिष्ठ पोलिस अधिकारी नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. या पूर्वीही बारामतीतच एका वरिष्ठ पोलिस
अधिकाऱ्याचे एका मुलीसोबतचे फोटो व क्लिप
व्हायरल झाल्यानंतर संबंधित पोलिस अधिकाऱ्याची तातडीने उचलबांगडी केली होती. त्या वेळी ते प्रकरण पार विधानसभेपर्यंत गाजले होते. त्या वेळीही वरिष्ठांनी शेवटच्या क्षणापर्यंत संबंधित अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचीच भूमिका घेतली होती.आता पुन्हा एकदा त्याच दर्जाच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचे हे मेसेज पोलिस खात्याच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरत आहेत. या बाबत पोलिसांना अजून कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नसली तरी पोलिसांनी उपलब्ध माहितीच्या आधारे चौकशी सुरु केलेली आहे, असे वरिष्ठ पोलिस
अधिकाऱ्याने नमूद केले.या घटनेची कुणकूण लागताच संबंधित अधिकारी पंधरा दिवसांच्या रजेवर गेलेले असल्याची माहिती पुढे आली. या प्रकरणी संबंधित महिलेला या पोलिस
अधिकाऱ्याने काही अश्लील इमोजीही पाठवलेले असून तिला आय लव्ह यू तसेच तुझा होकार आहे की नाही,ते एकदाच सांग. शेवटचं विचारतोय, असंही या मेसेजमध्ये म्हटल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे रात्री अकरानंतर हे मेसेज केले गेले आहेत पोलिसांच्या प्रतिमेबाबत विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी नुकतेच एक परिपत्रक प्रसिद्ध केले होते, त्यात पोलिसांच्या वर्तणूकीबद्दल काही सूचना देण्यात आल्या होत्या. पोलिस खात्याच्या प्रतिमेशी ही बाब संबंधित असून आता वरिष्ठ बारामतीतील या पोलिस अधिकाऱ्याविरुध्द नेमकी काय कारवाई करतात या कडे सर्वांचेच लक्ष असले तरी मात्र बारामतीत चर्चा ही जोरात चालू असल्याचे दिसत आहे.

No comments:

Post a Comment