विकासाची भलतीच झाली होती ना राव घाई..निकृष्ठ कामे करणारे ठेकेदाराला का घातले पाठीशी? बारामती नगर परिषदेच्या
नुतन इमारतीचा भाग कोसळल्याने चर्चेला उधाण..
बारामती:- बारामती शहर हे विकासाकडे वाटचाल करत असताना व माजी उपमुख्यमंत्री अजितदादा हे करोडो रुपये विकासनिधी आणत असताना व पहाटेच येऊन ह्या विकास कामाची पाहणी करत असताना असे निकृष्ठ कामे कसे होतात हे एक कोडंच आहे,पण यावर काही एक्शन घेतली जाईल का ही एक शंकाच आहे? बारामतीची सुसज्ज आणि अद्यावत वाटणारी इमारत किती निकृष्ट दर्जाची आहे, हे आता स्पष्ट झाले .आहे बारामती नगर परिषदेच्या नूतन इमारतीचा स्लॅबचा काही भाग कोसळल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली,बानपच्या सुसज्ज आणि अद्यावत इमारतीमध्ये अनेकदा डागडुजी करण्यात आली आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेली इमारत पावसाळ्यात गळते आहे. तर अनेक ठिकाणी प्लास्टरला तडे गेले आहेत. अनेक पिलरमधून पाणी पाझरत आहेत.त्यातच 28 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास बानपच्या इमारतीमधील पोर्चमध्ये प्लास्टर कोसळून कर्मचाऱ्याला दुखापत होता होता राहिली. सदर इमारतीचे बांधकाम रुपेश भादुले यांच्या मालकीचे मे. सिद्धी कन्स्ट्रक्शन, पुणे
यांच्या वतीने करण्यात आले असून अॅस्टयुट
इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. हे सल्लागार अभियंता
आहेत. मात्र इतके निकृष्ट दर्जाचे काम केले
असतानाही ठेकेदारावर बानप का मेहरबान आहे,
हे समजण्या पलीकडे आहे. बारामती नगर परिषदेची सुसज्ज आणि अद्यावत
इमारत ही विकासाच्या मॉडेलचा एक भाग आहे,काही दिवसांपूर्वी बारामती मधील करोडो रुपये खर्च करून उभी केलेली प्रशासकीय भवन ही भव्य इमारत उभी राहिली पण याच इमारतीत ऐन पावसाळ्यात अनेक ठिकाणी स्लॅब मध्ये लिकीज होते, तर बसवलेली फरशी अजूनही चालताना हलते व जणू पडतोय की असा भास होतो, ही आहे निकृष्ठ कामाची झलक तर नुकताच बारामतीत पालखी येणार म्हणून रस्त्याची कामे केली पण काही दिवसातच त्याची पुरती वाट लागली, आजही अनेक भागात रस्त्यावरून जाताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे, मग असे अनेक कामे आहेत की ते कोणा एकालाच आपल्याच मर्जीतल्या ठेकेदाराला द्यायचे व आलेल्या लाखो रुपयांची वाट लावायचा सद्या बारामतीत काही पुढाऱ्या कडून हा प्रकार चालू आहे याकडे अजितदादा लक्ष देतील का?अश्या निकृष्ठ कामे करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करणार का प्रश्न सर्व बारामती कराना पडला आहे.
No comments:
Post a Comment