बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये उघड लिलाव पद्धतीने कापूस खरेदी विक्री सुरू होणार
बारामती:-बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य यार्ड येथे बुधवार दि. २/११/२०२२ पासुन कापसाची उघड लिलाव पद्धतीने विक्रीस सुरूवात होणार आहे. बारामती मुख्य बाजार आवारात कापुस विक्री लिलाव दर बुधवार व शनिवार या दिवशी सुरू राहणार आहेत. लिलावाची सुरूवात दर बुधवार व शनिवार सकाळी ११.०० वाजता होईल अशी माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप व प्रशासक सुधाकर टांकसाळे यांनी दिली.
तरी कापुस उत्पादक शेतक-यांनी आपला शेतमाल निवडुन आणि स्वच्छ करून
आणावा. तसेच कापुस शेतमाल विक्रीस आणताना शेतक-यांनी मुख्य गेट वर गेट एन्ट्री करून आपली नाव नोंदणी करावी. ही विनंती आहे.कापुस खरेदी विक्री शुभारंभ श्री. संभाजीनाना होळकर व जवाहर शेठ वाघोलीकर यांचे शुभहस्ते होणार आहे. तरी सर्व शेतकरी, व्यापारी, हमाल मापाडी व संबंधित बाजार घटकांनी उपस्थित रहावे हि बाजार समिती तर्फे विनंती करणेत येत आहे.
No comments:
Post a Comment