महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई च्या पुढाकाराने...राजयोग फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन यांनी संयुक्तपणे वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या माध्यमातील पडद्यामागचे श्रमिकांना दिवाळी फराळ भेट... बीड:- बीड येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई च्या पुढाकाराने, रविवार दि.२३ ऑक्टोबर 2022 रोजी राजयोग फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन यांनी संयुक्तपने वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या माध्यमातील पडद्यामागचे श्रमिकांना दिवाळी फराळ भेट देण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे,माजी नगरसेवक डॉ.योगेश क्षीरसागर,तहसीलदार सुहास हजारे, संपादक संतोष मानूरकर, राजयोग फाउंडेशनचे संस्थापक दिलीप शेठ धूत, रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाउनचे अध्यक्ष सुनील पारख, पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, टीव्ही नाईनचे जिल्हा प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर, ज्येष्ठ पत्रकार नारायण नागरे यांची प्रमुख उपस्थित होते. यावेळी प्रिंट मीडियातील वृत्तपत्र छपाई कामगार, पेपर विक्रेते एजंट, पेपर वाटप करणारे मुले, पार्सल वाहतूक करणारे मुले, कॉम्प्युटर ऑपरेटर, वसुली प्रतिनिधी, व्यवस्थापक, जाहिरात प्रतिनिधी, वितरण प्रतिनिधी, संपादक, पत्रकार, महिला पत्रकार, सफाई कामगार, वाहन चालक, प्रेस फोटोग्राफर, इलेक्ट्रॉनिक्स पत्रकार, सोशल मीडिया पत्रकार अशा प्रातिनिधिक 100 पेक्षा अधिक श्रमिक कामगार, पत्रकारांना फराळ वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्यात आली. पत्रकार संघाच्या माध्यमातून सलग तीन वर्षांपासून परळ वाटप केले जाते.
Post Top Ad
Monday, October 24, 2022
Home
ताज्या घडामोडी
बीड
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई च्या पुढाकाराने...राजयोग फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन यांनी संयुक्तपणे वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या माध्यमातील पडद्यामागचे श्रमिकांना दिवाळी फराळ भेट...
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई च्या पुढाकाराने...राजयोग फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन यांनी संयुक्तपणे वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या माध्यमातील पडद्यामागचे श्रमिकांना दिवाळी फराळ भेट...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment