बापरे..दोन महिलांनी डॉक्टरलाच हनी ट्रॅप मध्ये गुंतवत सात लाखाची मागितली खंडणी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, October 21, 2022

बापरे..दोन महिलांनी डॉक्टरलाच हनी ट्रॅप मध्ये गुंतवत सात लाखाची मागितली खंडणी..

बापरे..दोन महिलांनी डॉक्टरलाच हनी ट्रॅप मध्ये गुंतवत सात लाखाची मागितली खंडणी..
जळगाव :- महाराष्ट्रात हनी ट्रॅप चे प्रमाण वाढत असताना काही प्रकरणे पुढे येतात तर काही प्रकरणे आर्थिक तडजोड करून मिटविले जातात अशी  घटना नुकताच घडली याबाबत मिळालेली माहिती अशी की,शहरातील प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या ४० वर्षीय डॉक्टरकडे उपचाराच्या नावाने आलेल्या
महिलांनी डॉक्टरलाच हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले.डॉक्टरची व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत सात लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी
डॉक्टरांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली.जळगाव शहरात न्यायालयाशेजारी दवाखाना असलेल्या डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे शनिवारी (ता. १५) उपचारासाठी आलेल्या दोन महिलांनी (एक महिला जळगाव शहरातील व दुसरी यावल तालुक्यातील आहे.)औषधोपचाराच्या नावाने ओळख निर्माण करून कटकारस्थान रचले. संबंधित डॉक्टरांकडे उपचाराला आलेल्या महिलेसोबत असलेल्या तरुणीसोबत
असताना डॉक्टरांचे मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. चित्रीकरण झाल्याची खात्री झाल्यावर चेतन व हिरामण नावाच्या संशयितांनी डॉक्टरांच्या खोलीत शिरून त्यांना मारहाण करत तुमचे कारनामे व्हायरल करतो, असे धमकावून सात लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. शेवटी या त्रासाला कंटाळून डॉक्टरने शहर पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली. जळगाव शहरातील पिंप्राळा हुडकोतील एक व यावल तालुक्यातील दुसरी तसेच जळगावच्या इतर दोन अशा चौघींसह चेतन राजेंद्र कासार, हिरामण एकनाथ जोशी,प्रदीप सुरेश कोळी, (सैदाणे), संदीप बबन लोंढे (सर्व
रा.जळगाव) यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment