बारामती बस स्थानकास विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे,अन्यथा आत्मदहन करणार- रिपब्लिकन युवा सेनेचा इशारा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, October 6, 2022

बारामती बस स्थानकास विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे,अन्यथा आत्मदहन करणार- रिपब्लिकन युवा सेनेचा इशारा..

बारामती बस स्थानकास विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे,अन्यथा आत्मदहन करणार- रिपब्लिकन युवा सेनेचा इशारा..                                                               बारामती:- बारामती बस स्थानकास विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे म्हणून गेल्या १५ वर्षा पासून च्या मागणी कडे बारामती चे लोक प्रतिनिधी यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे लेखी पत्रात म्हंटले आहे, महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते मा अजित पवार हे डॉ काटे हॉस्पिटल बारामती येथे उद्घाटन कार्यक्रमाला आले असता दिलेल्या निवेदनात असा इशारा दिला आहे की बारामती बस स्थानकाचे उद्घाटन लवकरच होणार आहे या उद्घाटन कार्यक्रमा वेळी जर बारामती बस स्थानकाला विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले नाही तर  रिपब्लिकन सेनेचे नेते प्रशांत विष्णू सोनवणे हे आत्मदहन करणार आहे यांची सर्व जबाबदारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची व बारामती चे लोक प्रतिनिधी म्हणून आपली राहिल असे निवेदनात म्हटले आहे  त्या वेळी रिपब्लिकन युवा सेनेचे मा तुषार विजय गायकवाड, मा भाऊसाहेब भोसले बारामती तालुका प्रसिद्धी प्रमुख, मा शिवरुद्र धुमाळ बारामती शहर संघटक, मा प्रफुल्ल खटावकर बारामती शहर उपाध्यक्ष, मा. धीरज पडकर बारामती शहर उपाध्यक्ष तसेच बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment