तोफखाना केंद्राच्या २८५ मिडियम रेजिमेंटचे लान्सनायक संतोष गायकवाड यांना सिक्कीमच्या उत्तरेला आसामच्या 'लंका' नावाच्या लोकेशनवर वीरमरण..! नाशिक : नाशिक तालुक्यातील लहवितचे भुमीपूत्र व तोफखाना केंद्राच्या २८५
मिडियम रेजिमेंटचे लान्सनायक संतोष विश्वनाथ गायकवाड यांना सिक्कीमच्या उत्तरेला
आसामच्या 'लंका' नावाच्या लोकेशनवर कर्तव्य बजावताना वीरमरण आले. अधिकृत माहिती सिक्कीम आर्टीलरी मिडियम रेजिमेंटकडून नाशिकरोड तोफखाना केंद्राला कळविण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यांच्या मुळ गावी
लष्करी इतमामात बुधवारी (दि. २६) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास गायकवाड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.संतोष गायकवाड हे नाशिक येथील टकारी समाजातील तरुण युवक होते. त्यांच्या जाण्याने मूळगावी शोककळा पसरली.
No comments:
Post a Comment