सब गोलमाल है..बारामती तालुक्यात नाममात्र रॉयल्टी भरून हजारो ब्रास मुरूम व वाळू उत्खनन महसूल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने चालू..? बारामती:- बारामती तालुक्यातील असे अनेक गावे आहेत जिथे मोठ्या प्रमाणात अवैध मुरूम उत्खनन होत असल्याचे दिसत आहे, कुणी नाममात्र रॉयल्टी भरलंच तर त्याबदल्यात हजारो ब्रास मुरूम उत्खनन करत आहे,प्रमाणापेक्षा जास्त ओव्हर लोड मुरूम भरून भरधाव वेगाने ही वाहने रस्त्यावरून जाताना दिसतात तर यामध्ये अनेकांचे बळी गेले आहे, तर अनेकजण जखमी झालेत पण फरक प्रशासनाला पडत नाही आपल्या कार्यक्षेत्रात मुरूम उत्खनन होत असताना देखील तलाठी व मंडल अधिकारी त्याकडे काना डोळा करतात कुणी तक्रार केलीच तर त्यांनी रॉयल्टी भरली आहे असे उत्तर मिळते पण त्याने किती रॉयल्टी भरली व तो किती उत्खनन करतो याचा पाहणी केली आहे का?जर केली असेल त्याच्यावर काय कारवाई झाली?किती दंड झाला व तो दंड वसूल होतो का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे, खाजगी एजंट हाताशी धरून अश्या अवैध मुरूम व वाळू उत्खनन करणारे तसेच वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई न करण्यासाठी हजारो रुपये मलिदा लाटत असल्याचे कळतंय, तालुक्यातील अनेक गावांत असे मुरूम उत्खनन होत जिथे डोंगर नष्ट होत चालले असून पर्यावरणाची नासधूस होत आहे तर लाखो रुपये महसूल बुडत आहे याकडे तहसीलदार व उपविभागीय अधिकारी लक्ष देतील का ?ही शंका निर्माण झाली आहे. वारंवार तक्रारी करूनही व काही तलाठी यांनी हजारो ब्रास मुरूमचा पंचनामा करूनही तहसिल कार्यालयातुन धक्कादायक माहिती मिळतेय की तलाठी यांनी पंचनामा केला नाही, हे उत्तर एकूण कदाचित आपण बारामती विधानसभा मतदार संघात राहतो की नाय असे वाटू लागते कारण धडधडीत अवैध उत्खनन होत आहे सारं गाव पाहतेय त्याच्या तक्रारी होतायत तरी तलाठीनी पंचनामा केला नाही म्हणतात, तर तलाठी म्हणतात आम्ही पंचनामा केला असून तहसील कार्यालयात जमा केला आहे मग नक्की खरं कोणाचं धरायचे हा सगळा कारभार कोण व कोणासाठी चालवत आहे यांना शासनाच्या तिजोरीत महसूल वाढलेला नको आहे का?असा प्रश्न सद्या पडला आहे. याबाबत संबधीत हलगर्जीपणा करणार्यांवर चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी होत असून लवकरच यांची खातेनिहाय चौकशीची मागणी होणार आहे तर राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, महसूलमंत्री,विरोधी पक्ष नेते, पालकमंत्री यांच्याकडे लेखी व पुराव्यासह तक्रार सामाजिक संघटना व कार्यकर्ते करणार असल्याचे समजते, तर बारामती तालुक्यातील अशी गावे आहेत उदाहरण.खामगळ वाडी, उंडवडी, व आसपासची गावे,बऱ्हाणपूर,पारवडी,सावळ,पणदरे,सोनगाव,झारगडवाडी,सुपे, मूरठी, अश्या ठिकाणी मुरूम वाळू मोठ्या प्रमाणात उत्खनन होत आहे तर अशी अनेक गावं आहेत ज्या ठिकाणी देखील उत्खनन चालू असून नाममात्र रॉयल्टी भरून हजारो ब्रास उत्खनन चालू आहे याबाबत लवकरच बातम्या प्रसिद्ध करणार आहोत तोपर्यंत काय कडक कारवाई होतेय याकडे पाहणे गरजेचे आहे.
Post Top Ad
Wednesday, October 26, 2022
Home
ताज्या घडामोडी
बारामती
सब गोलमाल है..बारामती तालुक्यात नाममात्र रॉयल्टी भरून हजारो ब्रास मुरूम व वाळू उत्खनन महसूल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने चालू..?
सब गोलमाल है..बारामती तालुक्यात नाममात्र रॉयल्टी भरून हजारो ब्रास मुरूम व वाळू उत्खनन महसूल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने चालू..?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment