दादा आपण बारामतीच्या विकासाला देता गती.! पण त्याची अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे कशी होतेय माती.!! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, October 16, 2022

दादा आपण बारामतीच्या विकासाला देता गती.! पण त्याची अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे कशी होतेय माती.!!

दादा आपण बारामतीच्या विकासाला देता गती.! पण त्याची अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे कशी होतेय माती.!!                                बारामती:-मा. उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष विरोधी नेते अजितदादा पवार हे अहो रात्र बारामतीचा विकास व्हावा म्हणून झटत आहे, पहाटेच अश्या कामाची पाहणी करतात, सर्व खात्याचे अधिकारी वर्ग आपल्या बरोबर असतात त्यांना सूचना करतात, मात्र दादा आपण आणलेल्या निधीतून होत असलेली कामे सुरुवातीला चांगली वाटतात पण त्याचा काही दिवसात खरे चित्र पहायला मिळते जसे काही महिन्यांपूर्वी बारामतीत पालखी येत असते त्यावेळी नव्याने रस्त्याची कामे केली मात्र ती एक दोन पावसातच उचकटून गेली, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था आज बारामती शहरातील रस्त्याची झालेली पहायला मिळत आहे, तर अशी अनेक उदाहरणे आहे ती आम्ही हळू हळू मांडणार आहोतच पण नुकताच बारामती येथील सावळ या गावालगत असणाऱ्या आवाळे गावडे वस्ती ते लाकडी रोड चे मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रयत्नातून रस्ता काही महिन्यांपूर्वी केला पण हाच रस्ता मुरूम वाहणाऱ्या ट्रक, हायवा, ट्रॅक्टर मुळे पूर्ण उदवस्त झालाय, या रस्त्याने ये जा करणारे प्रवासी वाहनचालक या रस्त्याच्या बिकट अवस्थेने बेजार झाली आहे, या भागात अवैध मुरूम उत्खनन होत असल्याचे कळतंय याबाबत तलाठी महाशयांना याची कल्पना दिली असता बघतो, पाहतो एवढेच उत्तरे मिळतात तर पंचनामा केला आहे असे म्हणतात पण कारवाई काहीच नाही, तर तहसील कार्यालयातील महसूल विभागाकडून माहिती मिळते की पंचनामा झालाच नाही असे धक्कादायक उत्तरे मिळते यावरून तलाठी व महसूल अधिकारी यांचा ताळमेळ आहे का?अश्या बेकायदेशीर मुरूम वाहतूक करणाऱ्या वाहनावर व उत्खनन होत असलेल्या जागेवर जाऊन वेळीच कारवाई केली असती तर ही ओव्हर लोड वाहतूकीमुळे रस्त्याची वाट लागली नसती तर हा रस्ता किती मजबूत व उत्कृष्ट केला आहे हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व काम करणाऱ्या ठेकेदाराला च माहीत कारण अशी कामे पहायला शाखा अभियंता व अधिकारी यांना वेळच नसतो म्हणूनच निकृष्ठ दर्जाची कामे बारामतीत होत आहे याकडे दादा आपण लक्ष देणार की त्यांना पाठीशी घालणार असा  सवाल आपल्या मतदार संघातील मतदार करताना दिसत आहे.अशी अनेक कामाचा निकृष्ठ पणा हळू हळू दाखविणार असून अश्या बेजबाबदार काम करणाऱ्यावर काय कार्यवाही होतेय हे येणारा काळच सांगेल तोपर्यंत क्रमश:***

No comments:

Post a Comment