मारझोड करणाऱ्या पोलिसाला दणका,मारहाण करणाऱ्याला एक लाख रुपये द्यावेत मानवी हक्क आयोगाचे आदेश..
बारामती:- बारामतीचे ऍड तुषार झेंडे यांनी दिलेल्या माहिती नुसार एका नागरिकाला पोलिसांनी मारहाण केल्याच्या 'व्हायरल' व्हिडीओची बारामतीच्या वकीलांनी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे त्यावेळी तक्रार केली होती. त्याची दखल घेत संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिले
होते. त्यानुसार मारहाण केलेल्या व्यक्तिला
पोलिसांनी मारहाण केल्याबाबत एक लाख
रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.ऍड तुषार झेंडे यांनी दि. २७ मे २०२१ रोजी एका नागरिकाला काही पोलीस काठी लाथाबुक्क्यांनी मारहाण
करीत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर अॅड. झेंडे यांनी तो व्हिडिओ पोलीस महासंचालकांना ट्विट केला. त्यानंतर ती घटना जालना जिल्ह्यातील असल्याचे समजल्यावर त्यांनी तात्काळ जालन्याच्या पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधत
माहिती विचारली. अधीक्षकांनी ही घटना
घडल्याचे मान्य केले. ती प्रत्यक्षात दि.९ एप्रिल २०२१ रोजी घडल्याचे सांगितले.त्यावर झेंडे यांनी तातडीने राष्ट्रीय मानवाधिकार आयोग दिल्ली यांच्याकडे पोलीस अधीक्षक जालना यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. मानवाधिकार आयोगाने दि. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावली. तात्काळ खुलासा सादर करून
संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश दिले.
या दरम्यान मारहाण झालेल्या व्यक्तिला
आर्थिक मदत करून आयोगासमोर हजर
राहण्याचे आदेश दिले. गृह विभागाच्या
अहवालानंतर मारहाण झालेल्या व्यक्तीचे
नाव शिवाजी नारियालवाले असल्याची
माहिती पुढे आली आहे. गृह विभागाचे
सचिवांनी मारहाण झालेल्या व्यक्तीला
एक लाख रुपये भरपाई द्यावी. संबंधित
पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर
नियमानुसार कार्यवाही करावी. दोषी
आढळल्यास संबंधित रक्कम पोलिसांकडून
वसूल करावी, असे आदेश गृह विभागाच्या
सहसचिवांनी दिले आहेत.न्याय मिळवून दिल्याबद्दल ऍड तुषार झेंडे यांचे कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment