लोन अँप फसवणूक अशा गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई..
पुणे :- लोन अँपद्वारे खंडणी स्वीकारून फसवणूक केलेल्या टोळीच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे,लोन अॅप टोळीवर पहिल्यांदाच मोक्का लावण्यात आला आहे. गेल्या दीड वर्षात पुणे पोलिसांनी लोन अॅप टोळीवर पहिल्यांदाच मोक्का लावण्यात आला आहे. गेल्या दीड वर्षात पुणे पोलिसांनी शहरातील १०० टोळ्यांविरोधात मोक्का कारवाई केली असून, मोक्का कारवाईमुळे शहरातील संघटित गुन्हेगारीला चाप बसला आहे.लोन अॅपच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांची फसवणूक करण्यात आल्याचे गुन्हे दाखल झाले होते.अशा पद्धतीने फसवणूक करणाऱ्या चोरट्यांच्या त्रासामुळे नागरिक त्रस्त झाले होते. या टोळीच्या
विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, डॉ.जालिंदर सुपेकर, सायबर गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटक्के, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यावेळी
उपस्थित होते.लोन अॅप प्रकरणात मोक्का कारवाईचा प्रस्ताव सायबर गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे पाटील यांनी सादर केला. त्यानुसार धीरज भारत पुणेकर (वय ३६, रा. कुमठा नाका, सोलापूर), स्वप्नील
हनुमंत नागटिळक (वय २९, रा. पापाराम नगर,
विजापूर रस्ता, सोलापूर), श्रीकृष्ण भीमण्णा गायकवाड (वय २६, रा. भेकराईनगर, फुरसुंगी, हडपसर), प्रमोद जेम्स रणसिंग (वय ४३, रा. मुमताजनगर, कुमठा नाका,सोलापूर), सॅम्युअल संपत कुमार (वय ४०), सय्यद अकिब पाशा (वय २३), मुबारक अफरोज बेग (वय २२), मुजीब बरांद कंदियल इब्राहिम (वय ४२),मोहम्मद मनियम पित्ता मोहिदू (वय ३२, सर्व रा.
बंगळुरू, कर्नाटक) यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली.६७० गुंडांवर मोक्का
गेल्या दीड वर्षात शहरातील १०० गुंड टोळ्यांमधील ६७० सराईतांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा घालणे, दारूबंदी, अमली पदार्थ विक्री, लोन अॅप फसवणूक अशा गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या टोळ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. बंडू आंदेकर,निलेश घायवळ, सचिन पोटे, बापू नायर, सूरज ठोंबरे,
महादेव अदलिगे, अक्रम पठाण या प्रमुख टोळ्यांमधील सराईत कारागृहात आहेत.
No comments:
Post a Comment