धक्कादायक..बारामतीत माळेगावात अवैध ताडी पिल्याने दोघांचा मृत्यू..तर माळेगावात गांजा व चंदनची विक्री होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा.!
बारामती:-बारामती तालुक्यातील माळेगाव हे एक राजकीय वरदहस्त असलेले गाव या गावात कारखाना असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते,या ठिकाणी गुन्हे देखील गंभीर स्वरूपाचे घडले यामुळे पोलिसांवर देखील तेवढाच ताण पडत आला आहे लवकरच नव्याने भव्य पोलीस स्टेशनचे काम प्रगतीपथावर झाले आहे.नुकताच माळेगाव बुद्रुक परिसरामध्ये अवैध दारु व्यवसाय, तसेच ताडी विक्री करणाऱ्या व्यवसायिकांवर अलीकडच्या काळात पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची नोंद आहे. असे असतानाही आज माळेगावमध्ये ताडी विक्री
करणाऱ्या व्यक्तीकडून विषारी ताडी-विक्रीचे सेवन झाल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. राजू लक्ष्मण गायकवाड (वय 35), हनुमंता मारुती गायकवाड (वय 40, दोघेही रा. चंदननगर, माळेगाव बुद्रुक, ता. बारामती)अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत.या मृत्युमुखी पडलेल्या युवकांसमवेत भय्यू चिनापा
गायकवाड, सनी चिनाप्पा गायकवाड, भीमा कलाप्पा भोसले ह्या तीन युवकांनीही ताडीचे सेवन केलं होते. पण,त्यांना कोणताही त्रास होत नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. असे असले तरी संबंधितांवर 48 तास वैद्यकीय अधिकारी लक्ष ठेवून राहणार असल्याचे सांगण्यात आले. मयत राजू गायकवाड
यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे, तर हनुमंता गायकवाड यांच्या मागे पत्नी दोन मुलगे व एक मुलगी असा परिवार आहे. याबाबत माळेगावचे पोलिस निरीक्षक किरण अवचर म्हणाले की, माळेगावमध्ये घडलेली घटना ही दुर्दैवी असून याबाबत पोलिस कसून तपास करीत आहेत. या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाला आधार देण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे. तसेच, या
घटनेचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. दुसरीकडे,माळेगाव पोलिसांनी गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे तर अधिक तपास चालू आहे, यावेळी गावात मात्र वेगळीच दबक्या आवाजात चर्चा ऐकावयास येत आहे की गांजा व चंदन याची देखील विक्री चोरून चालू आहे फक्त तपास प्रामाणिक झाला पाहिजे कारण पोलीस स्टेशन च्या परिसरात काही अवैध धंदेवालेच फिरकताना दिसतात त्यामुळे कुणी तक्रार करण्यास पुढे येत नाही यामुळे अश्या धंदेवालेचे फावत आहे.
No comments:
Post a Comment