बारामतीतल्या गर्दीच्या नियोजनाला नगर परिषद व पोलीस प्रशासन बरोबर दुकानदार ही जबाबदार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, October 23, 2022

बारामतीतल्या गर्दीच्या नियोजनाला नगर परिषद व पोलीस प्रशासन बरोबर दुकानदार ही जबाबदार..

बारामतीतल्या गर्दीच्या नियोजनाला नगर परिषद व पोलीस प्रशासन बरोबर दुकानदार ही जबाबदार..                                               बारामती:- दिपावली सणाचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा होतो याच पार्श्वभूमीवर बारामतीत खरेदीदाराची गर्दी वाढते, मोठमोठे दुकाने थाटामाटात सजवलेले असतात बाहेर गावाहून येणारी ग्राहक व बारामतीतील असणारे ग्राहक हे खरेदीसाठी येणार. त्यामुळे गर्दी वाढणार हे पूर्वीपासून बारामती नगर परिषद व पोलीस स्टेशन यांना माहीत असावं व त्यापद्धतीने नियोजन ही केलं असावं मग.. खुद्द रस्त्यावरच्या गर्दीला जे ट्रपिक जॅम झाले आणि या ट्रपिक मध्ये आदरणीय पवार साहेब यांच्या पत्नी सौ प्रतिभाताई पवार यांना या ट्रपिकमुळे अडकावे लागले व गाडी तुन खाली उतरून गर्दी कमी करावी लागली,यामुळे अनेकांनी पोलीस यांना दोष दिला नियोजनाचा ठपका त्यांच्यावर ठेवला,हो हे कदाचित बरोबर ही असेल पण या होणाऱ्या गर्दीला खरे कारणीभूत बारामतीतील काही मोठे दुकानदार ज्यांच्यामुळे ही गर्दी वाढली..आपल्या दुकानासमोर भले मोठे जाहिरातीचे बॅनरचे जाळे उभा केलेले आहे तर दुकानासमोरच वाहनांची पार्किंग करून रस्त्यात अडचण केली त्यामुळे ये जा करणारी वाहने अडकली जाऊ लागली रस्त्यात पार्किंग केलेल्या वाहनांमुळे व कमानी बॅनर मुळे तसेच जाहिरातीचे बोर्ड मुळे गर्दी वाढली याला खरे जबाबदार  हे मोठे दुकानवाले तसेच भिगवण रोड वर असणारे मॉल व बझार वाले आहे तसेच यांच्यावर अनधिकृत बोर्ड प्रमाणापेक्षा जास्त लावले व त्यावर कारवाई न करणारे बारामती नगर परिषदही जबाबदार आहे, वारंवार कल्पना देऊनही यांनी अश्या अनधिकृत बोर्ड, बॅनर व कमानीवर कारवाई केली नाही.तसेच तीन हत्ती चौकातला पुलाचे काम करण्याअगोदर पर्यायी रस्त्याचे नियोजन करणे गरचेचे होते त्यामुळे शाळेतील लहान मुलांना ने आन करताना होत असलेली अडचण तसेच भिगवण रोड, कडे ये जा करणारी वाहने याला जबाबदार हे याचे नियोजन न करणारे प्रशासन आहे या सर्वामुळे बारामतीकरांना नाहक त्रास सहन करावा लागला व लागतोय याची कुणालाच काळजी नव्हती पण काल जेव्हा सौ प्रतिभाताई पवार यांनाच या वाहतुकीचा अडथळा दिसला आणि स्वतः गाडीतून खाली उतरून गर्दी कमी केली तेव्हा कुठे आमच्या बारामतीतील अधिकारी वर्ग खडबडून जागे झाले असावे पण बेशिस्तपणे व अनधिकृत बोर्ड व बॅनर व कमानी लावणाऱ्या दुकांदारावर कडक कारवाई करणार हे लवकरच कळेल पण तोपर्यंत नियोजनाचा अभाव असल्याचे मात्र दिसून आले.

No comments:

Post a Comment