शासकीय योजनांमध्ये पत्रकारांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आमदार श्रीकांत भारतीय यांची ग्वाही..
औरंगाबाद (प्रतिनिधी): सुरुवातीच्या काळात पत्रकार म्हणून काम केले असल्यामुळे पत्रकारांचे प्रश्न माहित आहेत. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे हे ही सातत्याने पत्रकारांच्या प्रश्न मांडत असतात. आपले सरकार आल्यामुळे मी पत्रकारांचे प्रश्न प्राधान्याने सोडविल आणि शासकीय योजनांमध्ये पत्रकारांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करेल अशी ग्वाही आमदार श्रीकांत भारतीय यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयात बुधवार दि. 12 ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार श्रीकांत भारतीय यांचा पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी सत्कार केला. यावेळी कोरोना नंतर विशेषतः वृत्तपत्र व्यवसायात निर्माण झालेली विदारक परिस्थिती आणि पत्रकारांच्या समस्या वसंत मुंडे यांनी माडून पत्रकारांचे प्रतिनिधी म्हणून विधीमंडळात आवाज उठवावा अशी मागणी केली. यावेळी बोलताना आमदार श्रीकांत भारतीय यांनी आपण सुरुवातीच्या काळात पत्रकार म्हणून काम केले असल्यामुळे पत्रकारांच्या समस्या माहित आहेत. प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे हे ही सातत्याने समस्या मांडत असतात. सरकार माझ्या पक्षाचे असल्याने पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण पुढाकार घेवू. सरकारी योजनांमध्ये पत्रकारांचा समावेश वाढला पाहिजे यासाठी पाठपुरावा करू अशी ग्वाही त्यांनी दिली. तर तर्पण संस्थेच्या माध्यमातून 168 अनाथ मुलांचे शैक्षणिक पुनर्वसन केले असुन आता अखिल भारतीय पातळीवर अठरा वर्षावरील अनाथ मुलांच्या शैक्षणिक आणि सामाजिक पुनर्वसनासाठी संस्था काम करत आहे. तर्पणच्या माध्यमातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेला एक मुलगा अमेरिकेत जातो आहे. तेथेही त्याची सर्व जबाबदारी संस्थेने स्वीकारली आहे. काही मुले शासकीय नोकरीत जात आहेत. अठरा वर्षावरील मुलांच्या शैक्षणिक आणि सामाजिक पुनर्वसनासाठी काम करणारी तर्पण ही देशातील एकमेव संस्था आहे. प्रामाणिक हेतुने काम केल्यानंतर लोक मदतीला उभे राहतात याचा अनुभव आपण तर्पणच्या कामातून घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ओमप्रकाश शेट्ये, राजू शिंदे, समीर राजुरकर, शिवाजी दांडगे, मनोज भारस्कर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष डॉ.प्रभू गोरे, संघटक विलास शिंगी, कोषाध्यक्ष मुकेश मुंदडा, संजय व्यापारी, सुधीर कोर्टीकर, ज्ञानेश्वर तांबे पाटील, सोमनाथ शिंदे, ज्ञानेश्वर बावणे, आरेफ देशमुख, सतिश देशपांडे आदी पत्रकारांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment