अजूनही वाड्या वस्त्यांवर रस्त्याच्या समस्या, आठ वर्षांपासून वाट पाहतोय कधी होईल रस्ता, कारण येथील नागरिक खातायेत खस्ता.! डोर्लेवाडी:-मोठया दिमाखात बारामती तालुक्याचा विकास होतोय म्हणून सांगितले जाते परंतु आजही अनेक वाड्या वस्त्यांवर रस्त्याच्या अवस्था फार वाईट आहे, चिखलमय रस्त्यावरून ये जा करताना होत असलेला त्रास हे प्रत्यक्षात येऊन अनुभवल्यास कळेल अशीच एका वस्तीवर आठ वर्षांपूर्वी रस्ता करण्याचे आदेश दिले. त्यासाठी जिल्हा परिषदेकडून वर्क ऑर्डर निघाली. निधीदेखील मंजूर झाला. मात्र उदासीन प्रशासन व राजकीय हस्तक्षेपामुळे झारगडवाडी येथील दलितवस्तीचा रस्ता रखडला आहे.याबाबत येथील रहिवासी, सचिन
थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार,
रस्ता तयार करण्यासाठी टोलवाटोलवी अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. थोरात यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी,
पंचायत अधिकारी,समिती गटविकास
ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी,
सरपंच यांना अनेक वेळा या बाबत
पत्रव्यव्हार केला आहे. मात्र या वर
कार्यवाही झालेली नाही. थोरात वस्ती
येथे मोठी लोकवस्ती असल्याने हा रस्ता वहिवाटीसाठी अत्यंत महत्त्वाचा
आहे, तरीदेखील याकडे जाणूनबुजून
दुर्लक्ष केले जात आहे. पावसाळ्यात
येथील रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था होत असते या रस्त्याने लोकांना चिखलामुळे चालणे ही कठीण होत असते. थोरात वस्ती
झारगडवाडी येथील रस्ता प्रश्न लवकरात लवकर मार्गी नाही लागला तर येथील रहिवाशांनी ऐन
दिवाळीमध्ये आंदोलन व उपोषणाचा इशारा दिला आहे. *झारगडवाडी गावातील थोरात वस्ती येथील तहसीलदार यांनी २०१४ मध्ये मामलेदार २००५ मध्ये रस्ता रस्ता करण्याचे आदेश दिला होता. जिल्हा परिषदने या रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर दिली आहे.निधीदेखील मंजूर केला आहे. मात्र केवळ ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासीनतेमुळे राजकीय हस्तक्षेपामुळे रस्त्याचे काम मागील अनेक वर्षांपासून रखडले आहे. अनेक वर्षांपासून आमच्यावर अन्याय होत आहे. अजून किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार,असा सवाल येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते सचिन दादासो थोरात यांनी केला आहे.*
No comments:
Post a Comment