अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ गुन्हे शाखेची दमदार कामगिरी, ८,७१,९६०/- रुपये किंमतीचा गुटखा मुद्देमालसह जप्त.. कोंढवा:- अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ गुन्हे शाखेची दमदार कामगिरी कोंढवा येथे छापा टाकुन किंमत रुपये ८,७१,९६०/- रुपये किंमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला
तंबाखुजन्य पान मसाला व गुटखा अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ च्या स्टाफने पकडला याबाबत माहिती अशी की,अंमली पदार्थ विरोधी पथक-२ कडील पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस उप निरीक्षक एस डी नरके तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक-२ कडील अंमलदार हे परिमंडळ ५
मधील कोंढवा पोलीस ठाणेच्या परीसरात दिनांक १४/१०/२०२२ रोजी ०८/०० वा पासुन पेट्रोलींग करीत असताना पोलीस हवालदार १६८३ चेतन गायकवाड यांना बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, येवलेवाडी ते खडी मशिन चौक दरम्यान इसम नामे सिराज नुरआलम मनसुरी वय २९ वर्षे रा स.न.४२ नुर मश्जिद जवळ कोंढवा पुणे हा सिल्व्हर रंगाचा टेम्पो क्रमांक एम. एच. १२/टी / व्ही. ७६१६ यामधुन महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखुजन्य पान मसाला व गुटखा याची पोती विक्री करीता घेऊन जाणार आहे. त्याप्रमाणे मिळालेल्या बातमी वरुन अंमली पदार्थ विरोधी पथक -२, कडील अधिकारी व अंमलदार यांनी वरील परीसरात सापळा लावला असता दांडेकरनगर सिंहगड कॉलेज जवळ येवलेवाडी कोंढवा पुणे येथे सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी इसम नामे सिराज नुरआलम मनसुरी वय २९ वर्षे रा स.न. ४२ र मश्जिद जवळ कोंढवा पुणे हा सिल्हर रंगाचा टेम्पो क्रमांक एम. एच. १२/टी / व्ही. ७६१६ घेऊन येत असताना त्यास ताब्यात घेऊन त्याचे व त्याचे ताब्यातील टेम्पोची झडती घेतली
असता टेम्पो मध्ये ४,२३,३६०/- रूकिचा तंबाखुजन्य पान मसाला व गुटखा २) ५,००,०००/- रू कि च्या टेम्पो एम. एच. १२/टी/ व्ही. ७६१६ जप्त करुन त्याचेकडे तपासा दरम्यान चौकशी करुन त्याने बोपगाव ता- पुरंदर येथे असलेले गोडाऊनमध्ये अणखीन माल ठेवला असलेबाबत सांगीतलेने सदर गोडाऊन येथे छापा कारवाई करुन ४,४८,६००/- रुपये किंमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेले तंबाखुजन्य पदार्थ, पानमसाला व गुटखा जप्त करण्यात आला आहे.आरोपीकडुन एकुण किं. रु.१३.८१,९६०/- रुपयांचा ऐवज त्यामध्ये एकुण ८,७१,९६०/- रुपये किंमतीचा तंबाखुजन्य पान मसाला व गुटखा व ५,००,०००/- रू कि च्या टेम्पो एम. एच. १२/ टी व्ही. ७६१६ जप्त करुन त्याचे विरुध्द पोहवा / १६८३ चेतन गायकवाड यांनी कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं. १०३१ / २०२२ भादवि कलम ३२८,१८८, २७२, २७३,
सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा व वितरण यांचे विनीमय) अधिनियम कलम ७ (२) व २० (२) अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम २००६ चे कलम २६ (२)(i)(iv) चे
उल्लंघन केल्याने कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उप निरीक्षक दिगंबर चव्हाण यांनी सदरचा तंबाखुजन्य पान मसाला व गुटखा जप्त केला असुन दाखल गुन्हयाचा तपास स्वतः करत आहेत.वरील नमुद कारवाई ही मा.पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री श्रीनिवास घाडगे, मा. सहा
पो आयुक्त, गुन्हे २ श्री नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, २ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक एस डी नरके, पोलीस अंमलदार पो हवा. ५६२३ संतोष देशपांडे, पो. हवा. ५७०८ प्रशांत बोमादंडी, पो. हवा. ५७२२ संदिप जाधव, पो. हवा. ५८२२ रोकडे, पो. हवा.३०३५ मयुर सुर्यवंशी, पो. हवा. १६८३ चेतन गायकवाड, पो.ना.७३४७
शेख, पो. ना.७८५४ शेळके, मपोना. ६२९४ दिशा खेवलकर, पो. शि.८११६ नितीन जगदाळे, पो. शि. ८१७१ योगेश मांढरे,पो.शि.८४७५ शेख, पो.शि.९१२२ युवराज कांबळे व पो. शि. १०५०३ दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment