बापरे पुन्हा एखादा..आंघोळ करतानाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार करत उकळली ५ लाख रुपयांची खंडणी... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, October 16, 2022

बापरे पुन्हा एखादा..आंघोळ करतानाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार करत उकळली ५ लाख रुपयांची खंडणी...

बापरे पुन्हा एखादा..आंघोळ करतानाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार करत उकळली ५ लाख रुपयांची खंडणी...
 पुणे :-काय चाललंय पुणे जिल्ह्यात कोण कुठल्या थराला चाललंय महिला सुरक्षित नाही याचे रोज नवे किस्से ऎकव्यास येत आहे,तर  अंघोळ करतानाचे व्हिडिओ काढण्याचे प्रमाण वाढत आहे, नुकताच महिलेचे आंघोळ करतानाचे फोटो व व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याचे धमकी त्याने दिली. तिला वेगवेगळ्या लॉजवर
नेऊन बलात्कार  केला व वेळोवेळी ५ लाख रुपयांची खंडणी  वसुल केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी संजय कुंदनलाल परमार(वय ५७, रा. एकबोटे कॉलनी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ३०७/२२) दिली आहे. हा प्रकार २०१८ पासून सुरु होता. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी हा फिर्यादीच्या आईच्या ओळखीचा आहे.फिर्यादी या आईच्या घरी आल्या असताना फिर्यादीच्या
नकळत त्याने फिर्यादी आंघोळ करत असतानाचे फोटो व व्हिडिओ काढला. हे फिर्यादीस दाखवून त्यांचे पती व नातेवाईकांकडे बदनामी करण्याची धमकी दिली.त्यानंतर त्यांना सातारा रोडवरील ॲम्बीयन्स लॉजवर घेऊन त्यांच्यावर बलात्कार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास पती व मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने हे फोटो व व्हिडिओ दाखवून बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे
वेळोवेळी पैसे उकळले. अशा प्रकारे आतापर्यंत ५ लाख रुपयांची खंडणी उकळली आहे. सातत्याने त्यांना लॉजवर बोलावून त्यांच्यावर तो अत्याचार करीत होता.शेवटी या त्रासाला कंटाळून त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक घाडगे अधिक तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment