तहसीलदारांना देण्यासाठी 10 हजार रुपये लाच घेताना भु करमपाकासह एजंट अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, November 24, 2022

तहसीलदारांना देण्यासाठी 10 हजार रुपये लाच घेताना भु करमपाकासह एजंट अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात..

तहसीलदारांना देण्यासाठी 10 हजार रुपये लाच घेताना भु करमपाकासह एजंट अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात..                        अमरावती : - लाच घेण्यासाठी एजंट नेमल्याचे अनेक प्रकरणातून उघड झाले आहे, आपल्या कार्यालयात खाजगी एजंट नेमून लाच घेणे अशी किती तरी उदाहरण पहावयास मिळतील असो पण एक घटना उघडकीस आले आहे याबाबत माहिती अशी की,शेतजमीन गावठाण पासून 200 मी च्या आत आहे किंवा कसे याबाबत सविस्तर चौकशी अहवाल तहसीलदार,
घाटंजी यांना लवकर देण्यासाठी दहा हजार रुपये लाच घेताना भुकरमापकासह एजंटला अमरावती
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  सापळा रचून रंगेहात पकडले. अमरावती एसीबीच्या पथकाने ही कारवाई गुरुवारी (दि. 24) केली. भूमी अभिलेख कार्यालय, ता. घाटंजी, जि. यवतमाळ येथील भु करमापक राजीकोद्दीन नाझीमोद्दीन काझी(वय 39), एजंट रामचंद्र दशरथ किनाके (वय 38) असे लाच घेताना रंगेहात पकलेल्यांची नावे आहेत. याबाबत 42 वर्षाच्या व्यक्तीने अमरावती एसीबीकडे लेखी तक्रार केली आहे. तक्रारदार यांची शेतजमीन गावठाण पासून 200 मी च्या आत आहे किंवा कसे याबाबत सविस्तर चौकशी अहवाल तहसीलदार, घाटंजी यांना लवकर देण्याकरिता भूमी अभिलेख कार्यालय घाटंजी जि.यवतमाळ येथील भूकरमापक काझी यांनी तक्रारदार यांना 20 हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी 9 नोव्हेंबर रोजी तक्रार केली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पथकाने 9 नोव्हेंबर आणि
बुधवारी (दि. 23) पंचासमक्ष पडताळणी केली.पडताळणी दरम्यान काझी यांनी तक्रारदार यांना 20 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडअंती 10 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर गुरुवारी (दि. 24) सापळा रचला.काझी यांनी तक्रारदार यांना एजंट रामचंद्र किनाके यांच्याजवळ लाचेची रक्कम देण्यास सांगितली.
किनके याला तक्रारदार यांचेकडून लाचेची रक्कम स्वीकारताना दोन्ही आरोपींना रंगेहाथ पकडले.आरोपींविरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती
परिक्षेत्र, अमरावती पोलीस अधिक्षक मारुती जगताप,अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, देविदास घेवारे,पोलीस उप अधीक्षक संजय महाजन,पोलीस उपअधीक्षक शिवलाल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष इंगळे,पोलीस अंमलदार सचिन भोयर, सुधीर कांबळे, अब्दुल वसीम,चालक पोलीस उपनिरीक्षक सतीश किटकुले यांच्या पथकाने केली.

No comments:

Post a Comment