हनी ट्रॅपमध्ये वृद्धाला अडकवून 14 लाखांना लावला चुना,वो बुलाती है मगर जाने का नहीं !
सांगली:-हनी ट्रॅप च्या प्रकरणात भलतीच वाढ होत असताना दिसत आहे, यामध्ये अनेकांना बकरा बनविलेले गेले तर कित्येकांचे संसार उदवस्थ झालेले पाहिले आहे,असाच एक प्रकार समोर आलाय, सध्या सोशलमीडियाच्या
अतिवापराचा काही लोक गैरफायदा घेत आहेत.
सोशलमीडियावर निणावी नंबरच्या माध्यमातून
फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार आपण ऐकत आलो आहोत.दरम्यान असाच एक प्रकार सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहरात घडला आहे. अर्धनग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन इस्लामपूर येथील सेवानिवृत्त वृद्धाला एका महिलेसह तिच्या
साथीदाराने साडेचौदा लाखांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.काल हा प्रकार समोर आला आहे. दरम्यान मागच्या दोन महिन्यापूर्वी हा प्रकार घडला होता. परंतु अब्रुला भिऊन सेवानिवृत्त वृद्धाने याबाबत कुठेही वाच्यता केली नव्हती. याप्रकरणी इस्लामपूर पोलिस ठाण्यात पूजा शर्मा, विक्रम राठोड या संशयितांविरोधात
गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी वृद्धाने फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य तपासणी हेल्थ केअर सेंटरमधून बोलत असल्याची बतावणी करून महिलेने व्हिडीओ कॉलिंगद्वारे वृद्धाचे फोटो घेतले होते. त्यानंतर संशयितांनी धमकी देऊन 3
सप्टेंबर ते 21 सप्टेंबर या कालावधीत वेळोवेळी लाखो रुपयांची रक्कम बँक खात्यावर मागवून घेतले होते. 8 सप्टेंबर रोजी संबंधित वृद्धाच्या मोबाईलवर संशयित पूजा शर्मा हिने कॉल केला होता. नंतर दोन, तीन दिवस तिने मेसेज पाठवले. मुंबई येथील हेल्थ केअर सेंटरमध्ये काम करीत आहे, असे तिने सांगितले.व्हिडिओ कॉल करून 'तुमची मेडिकल फाईल आली आहे. तुमची हेल्थ बघून फाईल रिटर्न करायची आहे',असे सांगितले. त्यानंतर व्हिडिओ कॉलवर वृद्धाचे चित्रीकरण केले. त्यानंतर संशयित पूजा हिने तिचे फोटो पाठवले. दोन दिवसांनी पूजा हिने वृद्धाच्या फोनवर त्यांचे अर्धनग्न फोटो पाठवले. फोटो सोशल मीडियावर टाकण्याची त्यांना धमकी दिली.संशयित विक्रम राठोड याने व्हाट्सअप वरून फोन करून वृद्धाला पोलिस असल्याची बतावणी केली.वृद्धाला 'त्यांचे फोटो इतर राज्यात व्हायरल झाले असून संशयित विक्रम राठोड याने व्हाट्सअप वरून फोन करून वृद्धाला पोलिस असल्याची बतावणी केली.वृद्धाला 'त्यांचे फोटो इतर राज्यात व्हायरल झाले असून ते थांबवायचे असतील तर खात्यावर पैसे पाठवावे लागतील', असे सांगितले. त्यानंतर वृध्दाने भीतीपोटी 1
लाख रुपये पाठवले. त्यानंतर वेळोवेळी विक्रम याने फोन करून वृध्दाला धमकी दिली. वृद्धाला बँकेच्या वेगवेगळ्या खात्यावर एकूण 14 लाख 40 हजार रूपये पाठवायला सांगून गंडा घातला. याप्रकरणी त्यांनी इस्लामपूर पोलिसात महिलेसह दोघविरूद्ध गुन्हा दाखल केला.विक्रम याने पूजा शर्मा हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फोटो वृद्धाला पाठविले. त्यानंतर हे प्रकरण
मिटवण्यासाठी शर्मा हिच्या घरच्यांना 10 लाख रुपये द्यावे लागतील, असा बनाव केला.याबाबत अधिक तपास चालू आहे.
No comments:
Post a Comment