सार्वजनिक बांधकाम विभागाचा कनिष्ठ
अभियंता 2 लाखाची लाच घेताना अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात..
चंद्रपूर : - सद्या ठेकेदाराला कामे देऊन त्यांच्याकडून टक्केवारी घ्यायची अनेक प्रकरणे पुढे येत असताना नुकताच केंद्र सरकारच्या
योजनेंतर्गत बांधलेल्या पुलाचे बिल मंजूर केल्याच्या मोबदल्यात आणि उर्वरीत पुलाचे बिल मंजुरीसाठी पाठवण्यासाठी दोन लाख रुपये लाच घेणाऱ्या चंद्रपूर सार्वजनिक बांधकाम विभाग, जिवती उपविभागाच्या कनिष्ठ अभियंत्याला चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. चंद्रपूर एसीबीच्या पथकाने ही कारवाई मंगळवारी (दि. 1 नोव्हेंबर) केली.अनिल जगन्नाथ शिंदे (वय-27) असे लाच घेताना रंगेहात पकडलेल्या कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे.
याप्रकरणी चंद्रपूर येथील 28 वर्षाच्या ठेकेदाराने
चंद्रपूर एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार हे ठेकेदार असून त्यांनी केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत जिवती तालुक्यात पुल बांधण्याचे काम केले
आहे. तक्रारदार यांनी चार पूल बांधले असून त्यापैकी दोन पुलाचे बिल मंजुरीसाठी पाठवले होते. ते बिल मंजुर झाल्यानंतर उर्वरीत दोन पुलांचे बिल मंजुरीसाठी पाठवण्यासाठी अनिल शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन लाख रुपये लाचेची मागणी केली.तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी 8 जून 2022 पडताळणी केली असता अनिल शिंदे यांनी बांधलेल्या दोन पुलांची बिले मंजुरीसाठी पाठवण्यासाठी दोन लाख रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.त्यानुसार मंगळवारी सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून दोन लाख रुपये लाच घेताना अनिल शिंदे यांना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर
परिक्षेत्र पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड ,
अपर पोलीस अधीक्षक मधुकर गिते यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर लाचलुचपत विभागाचे
पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे, पोलीस अंमलदार रमेश दुपारे,नरेशकुमार नन्नावरे, रोशन चांदेकर, रवी ढेंगळे, वैभव गाडगे, अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, पुष्पा काचोळे, मेघा मोहुर्ले यांच्या पथकाने केली.
No comments:
Post a Comment