महिला कामगारांवर डोळा ठेवण्याचा कसला आलाय *दम.! असले कृत्य करण्याचे का उजळले *दीप..! व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे बारामतीत खळबळ... बारामती:- बारामती नगरपरिषदेत गेली अनेक वर्षे झाली महिलांवर होत असलेले अन्याय हा उघडपणे न मांडता दबक्या आवाजात बोलताना ऐकावयास येत होते,पण काम व बदनामी यामुळे कोणी पुढे येत नाही,याठिकाणी वरिष्ठ लेव्हल पासून ते सफाई महिला कर्मचारी पर्यंत काम करणारे भगिनी यांना आदराने वागणूक देणे गरजेचे आहे, मागे एकदा अशीच एका वरिष्ठ अधिकारी याची अजब गजब की .. कहाणी. पुढे आली होती,या कार्यालयात महिला काम करतात हे आपल्या माताभगिनी आहेत याचा विचार व्हायला हवा कामाच्या नावाखाली नको ती वागणूक मिळत असेल तर काय करायचे हा प्रश्न पडतो, नुकताच बारामती मध्ये एक बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे याबाबत समजलेली माहिती अशी की,
आरोग्य विषयक कामे घेणाऱ्या ठेकेदाराकडील एका कर्मचाऱ्याने महिला कामगारांविषयी अश्लिल संभाषण करत या महिलेची मागणी करणारी ऑडिओ क्लिप बारामतीत व्हायरल झाली आहे.यामुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.गोरगरीब, असहाय्य महिलांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्या या नराधमांवर कडक कारवाईची मागणी होत आहे. उपलब्ध ऑडिओ क्लिपची बारामतीत सोमवारपासून जोरदार चर्चा आहे.राज्यात बारामती नगरपरिषदेचा नावलौलिक असताना गोरगरीब महिलांच्या बाबतीत ठेकेदाराकडील कर्मचाऱ्याकडून होणारी गळचेपी
चीड आणणारी आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाचे कंत्राट घेतलेल्या कंपनीच्या पर्यवेक्षक व कामगारांमध्ये यासंबंधीचा संवाद झाला आहे.
स्वच्छता काम करणाऱ्या काही महिलांपैकी कोण
सुंदर दिसते, अमक्या महिलेवर डोळा असून
कोणत्याही परिस्थितीत ती हवी आहे, अशी मागणी केल्याचे त्यात आढळून आले आहे. केल्याचे त्यात आढळून आले आहे.
यासंबंधी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी
मुख्याधिकारी महेश रोकडे यांची भेट घेत
संबंधितांवर कारवाईची मागणीही केली आहे. परंतु यानिमित्ताने ठेकेदार कंपन्या व त्यांच्याकडे काम करणारे पर्यवेक्षक, कामगार येथील असहाय्य,परिस्थितीने गांजलेल्या महिलांचा कसा फायदा घेतात, हे उघड झाले आहे. पालिकेसंबंधी घडलेला हा काही पहिलाच प्रकार नाही. परंतु या
ठेकेदाराकडील कर्मचाऱ्याने ही ऑडिओ क्लिप
व्हायरल केल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित
महिलांची नावेही या क्लिपमध्ये घेण्यात आली
आहेत.यासंबंधी पालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे म्हणाले, याप्रकरणी संबंधित ठेकेदाराला नोटीस काढण्यात आली आहे. व्हायरल ऑडिओ
क्लिपमधील दोघांनाही कामावर येवू नये, असे सक्त आदेश देण्यात आले आहेत. पालिकेचा यात संबंध नाही. ठेकेदाराकडून या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई होईलच पण यापुढे अश्या घटना घडता कामा नये याची खबरदारी घेतली पाहिजे,याठिकाणी काम करणाऱ्या महिला ह्या मागासवर्गीय समाजाच्या जास्त आहे,त्यांच्यावर जाणून बुजून अन्याय होतो हे अनेकांनी बोलून दाखविले आहे, तर असे ठेकेदार व सुपरवायझर यांना पाठीशी न घालता त्यांच्यावर कडक कारवाई करा अशी मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment