अवैध वाळू वाहतुक करणा-या जेसीबी व डंम्परवर कारवाई करत २६ लाखाचा मुद्देमाल जप्त..
शेवगाव :-अवैध धंदेचा सुळसुळाट चालू असून अश्याच प्रकारे चालणाऱ्या धंदेपैकी एक म्हणजे,अवैध वाळू, मुरूम उपसा व वाहतूक करणारे माफिया विरोधात कारवाई व्हावी अशी मागणी होत होती त्याअनुसंगाने खनिजाचा अवैध उपसा करणारा जेसीबी व वाळू वाहतुक करणा-या डंपरवर कारवाई करून २६ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करत दोघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई प्रभारी उपविभागीय पोलीस
अधिकारी संदिप मिटके यांच्या पथकाने आज शुक्रवार ता.११ रोजी पहाटे ६ च्या सुमारास खरडगाव ता.शेवगाव येथील नानी नदीपात्रात केली. या प्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे पो.काँ. सचिन मच्छिंद्रकाकडे यांच्या फिर्यादीवरुन अश्पाक सुलेमान शेख (
रा. वडुले बुद्रुक ता. शेवगाव ) व गणेश चंद्रकांत केदार( रा. लोळेगाव ता. शेवगाव ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत फिर्यादीत म्हटले आहे की, उपविभागीय
पोलीस अधिकारी संदिप मिटके यांना खरडगाव येथे अवैध वाळू वाहतुक सुरु असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार आज शुक्रवार ता.११ रोजी पहाटे ६ च्या सुमारास मिटके यांनी पथकासह नानी नदीपात्रात जावून पाहणी केली असता तेथे एक पिवळया रंगाचा विना क्रमांकाचा जेसीबी अश्याप सुलेमान शेख हा वाळू उपसा करतांना आढळून आला. तर गणेश चंद्रकांत केदार हा विनाक्रमांकाचा एक आकाशी रंगाचा डम्परमध्ये तीन ब्रास वाळू घेवून निघाला होता. त्याच
वेळी पथकाने शेख, केदार यांच्यासह २० लाख रुपये किमतीचा जेसीबी व ६ लाख १५ हजार रुपये किमतीचा डंम्पर असा एकुण २६ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. पोलीसांनी या प्रकरणी शेख व केदार यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक ए. एल भाटेवाल,हे.काँ. सुरेश औटी, पो. काँ. नितीन शिरसाठ, नितीन चव्हाण, सचिन काकडे, विलास उकीर्डे या पथकाने केली.
शेवगाव तालुक्यात मुंगीसह सर्वच नदया व
उपनदयावरुन गौनखनिजाचा अवैध उपसा सुरु आहे.या अवैध व्यवस्यामुळे तालुक्यात गुन्हेगारी वाढली असून यावर अंकुश ठेवण्याकडे महसुल व पोलीस प्रशासन अपयशी ठरले आहे. या व्यवसायाने तालुक्यात चांगलेच डोके वर काढले असून मिटके यांनी कारवाई करत धाडस दाखवले. महसुल व पोलीस प्रशासनाने अशीच संयुक्त कारवाई सुरु केल्यास या व्यवसायाला आळा बसल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment