नदीजोड प्रकल्पांतर्गत जोडन्याची मागणीचे दिले केंद्रीय राज्यमंत्री यांना निवेदन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, November 14, 2022

नदीजोड प्रकल्पांतर्गत जोडन्याची मागणीचे दिले केंद्रीय राज्यमंत्री यांना निवेदन..

नदीजोड प्रकल्पांतर्गत जोडन्याची मागणीचे दिले केंद्रीय राज्यमंत्री यांना निवेदन..                   बारामती:- दिनांक 12/11/2022 रोजी बारामती येथे प्रल्हाद सिंह पटेल केंद्रीय राज्यमंत्री जल शक्ती व खाद्य  मंत्री यांना निवेदन देण्यात आले यावेळी निवेदनात म्हंटले की, नाझरे धरण ते वीर धरण नदीजोड प्रकल्पांतर्गत जर जोडल्या गेले तर बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील 35 गावे व पुरंदर तालुक्यातील चाळीसगाव ही कायमस्वरूपी ओलिताखाली येथील व या भागातील हजारो हेक्टर क्षेत्र हे ओलिताखाली आले तर येथील जनता ही सुजलाम होऊन जाईल तरी कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त असलेल्या गावांसाठी नदीजोड प्रकल्प योजना राबवून ह्या गावांना कायमस्वरूपी पाणी मिळण्याबाबत भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा उद्योग आघाडी सचिव व बारामती तालुका सरचिटणीस बाळासाहेब बालगुडे यांनी केंद्रीय राज्यमंत्री श्री प्रल्हाद सिंह पटेल यांना निवेदन दिले बारामती तालुक्यातील मूर्टी, जोगवडी, मोडवे, उंबरवाडी, मोराळवाडी, लोणी भापकर, साहेबाची वाडी, आंबी, आंबे खुर्द, चांदगुडेवाडी, मोरगाव, तरडोली इत्यादी गावे ही कायमस्वरूपी दुष्काळी असून ती ओलीताखाली आल्यास शेकडो हेक्टर जमीन ही बारामती तालुक्यातील बारामती तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील शेतकरी हा पिढी जात दुष्काळग्रस्त आहे तो शेतकरी वर्ग हा कायमस्वरूपी ओलिताखाली येऊ शकतो म्हणून पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र भाई मोदी जी यांनी याकडे लक्ष घालून बारामती तालुक्यातील गावाचा विकास करण्यासाठी जी योजना राबवता येईल ती राबवावी अशी मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment