महिला सहायक पोलीस निरीक्षकाला का व्हावं लागलं निलंबित..
पुणे : –महिला अधिकारी देखील लाच घेत असल्याचे उघड झाले आहे असेच एका प्रकरणात लाच घेताना एक लाख रुपयांची लाच मागणाऱ्या पुणे पोलीस
दलातील महिला सहायक पोलीस निरीक्षकाला
निलंबित करण्यात आले आहे. हर्षदा बाळासाहेब दगडे असे निलंबित करण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे.हर्षदा दगडे या कोंढवा पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. याबाबत पोलीस
आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आदेश काढला आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील दोषारोप पत्रामध्ये मदत करुन आरोपीचे आई-वडील व बहीण यांना अटक न करण्यासाठी 1 लाख रुपयांची लाच मागितली होती. याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक
विभागाकडे तक्रार करण्यात आली होती.लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता दगडे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते.त्यानंतर दगडे यांच्या विरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल आहे.त्यामुळे दगडे यांनी केलेले वर्तन हे बेजबाबदार,बेफिकीर, नैतिक अधःपतनाचे असल्याचे त्यांना पोलिस आयुक्त गुप्तांनी खात्यातून निलंबीत केले आहे.
No comments:
Post a Comment