अनैतिक संबंधातून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा केला खून, दहा महिन्यानंतर झाला खुलासा..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, November 1, 2022

अनैतिक संबंधातून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा केला खून, दहा महिन्यानंतर झाला खुलासा..!

अनैतिक संबंधातून पत्नीनेच प्रियकराच्या
मदतीने पतीचा केला खून, दहा महिन्यानंतर झाला खुलासा..!                                          वडगाव निंबाळकर:- गुन्हेगारी वाढत असताना त्याला अवैध धंदे मुळे पाठबळ मिळते यातून पैसा मिळतो आणि गुन्हेगार जोशात राहतो चार दोन अल्पवयीन मुले हाताशी धरून गुन्हे करायला भाग पाडतो व यातून नको ते प्रकार घडतात, खून,दरोडे, खंडणी, मारामाऱ्या,अवैध धंदे करण्यास भाग पाडले जाते याची अनेक उदाहरणे आहेत गेल्या अनेक महिन्यापासून बारामती तालुक्यात गुन्हेगारी वाढली असल्याचे दिसत आहे, याला आळा कधी बसेल? तर नुकताच मिळालेल्या माहितीनुसार दहा महिन्यांपासून
बेपत्ता असलेल्या वडगाव निंबाळकर येथील
व्यक्तीच्या खूनाचा पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या
स्थानिक गुन्हे अन्वेषणने उलगडा केला. या प्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. जेरबंद पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. रोहित दत्तात्रय खोमणे, वृषाली वैभव यादव (वय २३ रा. वडगाव निंबाळकर),शिवदत्त उर्फ दादा श्रीधर सुर्यवंशी (वय २३) व सागर सर्जेराव चव्हाण (वय २७, सर्व रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती) अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.
१९ फेब्रुवारी २०२२ रोजी वृषाली यादव यांनी त्यांचे पती वैभव विठ्ठल यादव (वय ३१) हे बेपत्ता
असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली
होती. या गुन्ह्याचा तपास वडगाव निंबाळकर पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरु होता. पोलिस निरीक्षक अशोक शेळके, सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी पथके तयार करत तपास सुरु केला असता वृषाली हिने प्रियकर रोहित खोमणे व त्याच्या साथीदारांच्या मदतीने पतीचा खून केल्याचा निष्पन्न झाले. पोलिसांनी वडगाव निंबाळकर बस स्थानक
परिसरात सापळा रचत या चौघांना अटक केली.
चौकशीमध्ये त्यांनी वैभव यादव याला मारहाण
करून पाडेगाव (ता. फलटण, जि. सातारा) येथे
कालव्यामध्ये फेकून दिल्याची कबुली दिली. या
प्रकरणी पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता लोणंद (ता. खंडाळा, जि. सातारा) पोलिस ठाण्यात त्यासंबंधी अकस्मात मयत दाखल असल्याचे तसेच मयताची ओळख पटली असल्याचे दिसून आले.पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक इंगळे, सपोनि सोमनाथ लांडे, उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, हवालदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, राजू मोमीन, विजय कांचन,अजय घुले, धीरज जाधव, वडगावचे हिरामण खोमणे, पोपट नाळे, अमोल भुजबळ यांनी ही कारवाई केली.

No comments:

Post a Comment