हादरवणारी बातमी..मुलींचे शाळेत जाणे झाले अचानक बंद,मुलींशी शिक्षकाने असभ्य लैंगिक वर्तन केल्याचा संतापजनक प्रकार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, November 19, 2022

हादरवणारी बातमी..मुलींचे शाळेत जाणे झाले अचानक बंद,मुलींशी शिक्षकाने असभ्य लैंगिक वर्तन केल्याचा संतापजनक प्रकार..

हादरवणारी बातमी..मुलींचे शाळेत जाणे झाले अचानक बंद,मुलींशी शिक्षकाने असभ्य लैंगिक वर्तन केल्याचा संतापजनक प्रकार..

कोल्हापूर:- मुली सुरक्षित नाहीत याची अनेक उदाहरणे पुढे येत आहे, आत्तातर शिक्षकच असे कृत्य करत असल्याने पालक वर्गात संताप होत आहे, अशीच एक जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे . शाळेतील मुलींशी शिक्षकाने असभ्य लैंगिक वर्तन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे . कोल्हापूर जिल्ह्यातील पोर्ले इथल्या शाळेतून ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.याचा मुलींनी इतका घसका घेतला की मुली शाळेतच जात नव्हत्या . मुली शाळेत का जात नाही याची चौकशी केली असता चौकशीतून हा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. नामदेव पवार असं या प्रकरणात आरोप असलेल्या शिक्षकाचं नाव आहे,पोर्लेमधील घटना घटनेबाबत अधिक माहिती अशी की , कोल्हापूर जिल्ह्यातील पोर्लेमध्ये असलेल्या एका शाळेत हा प्रकार घडला आहे .काही दिवसांपासून मुली शाळेत जात नव्हत्या . मुली शाळेत का जात नाही याची चौकशी केली असता हे प्रकरण समोर आले आहे . या प्रकाराने पालकांना देखील धक्का बसला आहे .

No comments:

Post a Comment