दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा सरकारचा निर्णयाचे स्वागतांचे लाडु वाटुन मूकबधिरांनी व्यक्त केला आनंद . बारामती:- महाराष्ट्र शासनाने मूकबधिर दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे . व त्याची घोषणा २१ नोव्हेंबर २०२२ रोजी करण्यात येणार आहे . त्यानिमीत्त आज बारामती नगरपरिषदेसमोर शारदा प्रांगण येथे नागरिकांना लाडु वाटुन आनंद साजरा केला महाराष्ट्र राज्य मूकबधिर दिव्यांग कल्याण संघटनेच्या वतीने एकमेकांना लाडु भरवुन आणि फटाके वाजवुन,नाचुन आनंद व्यक्त करण्यात आला.तसेच यावेळी मुकबधिर दिव्यांग बांधवांना मा . मुख्यमंत्री श्री . एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व प्रहार संघटनेचे मा.संस्थापक अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांचे आभार मानले आहे, तसेच गेल्या २५ वर्षापासून आमची हि मागणी होती . प्रहार संघटेनेचे मा . संस्थापक अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आम्ही लढा उभारला . आमचा लढा सत्कारणी लागला असल्यामुळे आम्ही आनंदी आहोत या मंत्रालयाच्या माध्यमातुन आम्हा मुकबधिरांच्या समस्यांना आता योग्य तो न्याय मिळणार असल्याची प्रतिक्रीया यावेळी मुकबधिर बांधवांनी व्यक्त केली . त्यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संस्थाचे मा . श्री . रामदास खोत , महासचिव तथा प्रमुख्य संपर्क आणि तसेच प्रहार अपंग क्रांती संस्था ( संलग्न ) , महाराष्ट्र राज्य मुकबधिर दिव्यांग कल्याण संघटनेचा मूकबधिर संघटना राज्य प्रहार तथा राज्याध्यक्ष श्री . प्रकाश शिंदे , ता . बारामती प्रतिनिधी अशोक मोरे ता . बारामती सदस्य भिमराव कोरडे,हनुमत नवले,हनुमत देवकाते, रुपेश चिंचकर,रविं वाघमोडे,अविनाश दंडवते, नितीन खोरे,अक्षय खराडे, विराज खोमणे,अक्षय भंडलकर, योगेश मोरे ,अतिश गायकवाड ,राजू पुणेकर,मुस्ताक खान,रणजित भोसले, प्रकाश बगाडे, सचिन सुर्यवंशी आदींसह इतरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .
-
No comments:
Post a Comment