बारामती शहर पोलिसातर्फे दोन लोकांना सहा महिने तडीपार..
बारामती:- शहरातील सुनील संभाजी माने व विनोद शिवाजी माने. यांच्यावर गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याने व अलीकडेच त्यांनी हत्या करण्याचा प्रयत्न करण्याचा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने. त्यांना तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव बारामती शहर पोलिसातर्फे. माननीय पोलीस अधीक्षक. डॉक्टर अभिनव देशमुख यांच्याकडे पाठवण्यात आला होता. त्यांनी वरील दोन्ही इसमांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांना सहा महिन्याकरता इंदापूर दौंड पुरंदर बारामती तसेच नजीकच्या फलटण तालुक्यातून सहा महिन्याकरता तडीपारचे आदेश काढले. सदर आदेशाची बजावणी करण्याचे आदेश नवनियुक्त पोलीस अधीक्षक अंकित गोयल तसेच अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी तात्काळ बारामती शहर पोलिसांना दिले त्याप्रमाणे आज या दोन्ही आरोपीविरुद्ध तडीपारीची नोटीस बजावणी करण्यात येऊन त्यांना सहा महिन्याकरता वरील तालुक्यातून हद्दपार करण्यात आलेली आहे. याही पुढे जर गुन्हेगारी रेकॉर्ड असणाऱ्या इसमाबरोबर कोणी गुन्हे केले तर त्यांच्यासोबत मुक्काम पीडीए किंवा तडीपारी सारख्या कारवाईला सर्व गुन्हेगारी समूहाला सामोरे जावे लागेल. सर्व गुन्हेगारांचे रेकॉर्ड अध्यायावत करण्यात आलेली असून त्यांनी जर गुन्हेगारी कारवाई केली तर त्यांना या प्रकारच्या प्रतिबंधक कारवाया करण्यात येणार आहे
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस कर्मचारी अजित राऊत दशरथ इंगोले. संजय जगदाळे, दशरथ कोळेकर यांनी केलेली आहे. काही दिवसापूर्वीच अक्षय उर्फ मोरया जाधव याला झोपडपट्टी दादा कायद्याप्रमाणे एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याचे आदेश माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा कायम केलेले आहेत.
No comments:
Post a Comment