बनावट बांधकाम परवाना दाखवुन सुरु असलेले हॉस्पिटल बंद करण्याचे आदेश* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, November 10, 2022

बनावट बांधकाम परवाना दाखवुन सुरु असलेले हॉस्पिटल बंद करण्याचे आदेश*

*बनावट बांधकाम परवाना दाखवुन सुरु असलेले हॉस्पिटल बंद करण्याचे आदेश*

पुणे :- पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे हॉस्पिटलचा परवाना घेण्यासाठी गुंठेवारी व बांधकाम परवाना विषयीची बनावट कागदपत्रे सादर करत पालिकेची फसवणुक करुन हॉस्पिटल चालवण्याचा मिळविलेला परवाना आज पुणे महानगरपालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती व सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा नाईक यांनी रद्द केला आहे.

कोंढवा येथील ताहेरा हॉस्पिटल या नावाने खान मोहसिन नबी व डॉ. सलीम आळतेकर, डॉ. किशोर चिपोळे, डॉ. अकबर खान या व्यक्तींनी पालिकेची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर हॉस्पिटल सुरु केल्याबाबतची तक्रार रिपब्लीकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे तसेच रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी महापालिकेकडे केली होती.

सदर तक्रारीच्या अनुशंगाने अतिरिक्त आयुक्त श्री.कुणाल खेमणार यांनी चौकशीचे आदेश दिले होते. सदर चौकशीत हॉस्पिटल चालकाने तक्रारीनंतर परवानगीसाठी दाखल केलेल्या बांधकाम विभागाच्या कागदापत्रांची पडताळणी केल्यानंतर गुंठेवारी व बांधकाम परवाना विषयीची कागदपत्रे पुर्णत: बोगस असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सदर ताहेरा हॉस्पिटलचा परवाना रद्द करत असल्या बाबतची नोटीस आज देण्यात आली.

दरम्यान सदर प्रकरणी ३ महिने पाठपुरावा केल्यानंतर ही बनावटगिरीची बाब समोर आल्याने या प्रकरणी बनावट दस्त सादर करुन पालिकेची फसवणुक केल्या प्रकरणी हॉस्पिटल चालकांवर व त्यांना सहाय्य करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी राहुल डंबाळे यांनी पालिका आयुक्त तसेच शिवाजीनगर पोलीस ठाणे यांच्याकडे केली आहे.

सदर प्रकरणी गुन्हा दाखल न झाल्यास मंगळवारी पालिका भवनासमोर आंदोलन करण्याचे डंबाळे यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment