खळबळजनक...प्रेम विवाह करणाऱ्या प्रेयसीच्या भावाचा,आईचा प्रियकराच्या भावावर जीवघेणा हल्ला..
बारामती:- माळेगाव कॉलनी लक्ष्मी नगर या ठिकाणी शेजारी असणाऱ्या सज्ञान मुलगी व मुलगा यांचे काही दिवसापासून प्रेम संबंध निर्माण झाले. दोन्ही घरच्यांचा विरोध असल्याने प्रियकर व प्रेयसी लग्न करण्यासाठी घरातून निघून गेले. त्यानंतर प्रियसीची आई सुनिता संजय चव्हाण वय 46 वर्ष व भाऊ मयूर संजय चव्हाण व बावीस वर्ष हा वारंवार प्रियकराच्या घरी जाऊन त्याचा भाऊ विकास राजेंद्र वाबळे वय 27 वर्ष आई व वडील यांना. गुंडगिरीची भाषा वापरून मनगटशाहीच्या जोरावर तात्काळ मुलाला बोलून घ्या याबाबत दमदाटी करू लागले. परंतु मुलाच्या नातेवाईकांना त्यांचा मुलगा कुठे गेला याबाबत काहीही माहिती नसल्याने ते हतबल होते व पोलीस ठाण्याला सुद्धा त्यांनी भीती पोटी तक्रार दिली नाही . त्यानंतर दिनांक 25.11.22रोजी सायंकाळी 8.00 वा. गुंड प्रवृत्तीचा मयूर चव्हाण व त्याची आई सुनिता चव्हाण यांच्या घरी गेली व तात्काळ मुलाला हजर करा अशी दमदाटी करू लागली दहशत निर्माण करण्यासाठी मयूर चव्हाण याने विकास वाबळे याच्या डोक्यात दगड मारला त्याच्या लहान मेंदूला दगड लागल्याने तो जाग्यावर बेशुद्ध पडला त्यानंतर सदर आरोपी व त्याची आई आणि त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या मारामारीत विकास राजेंद्र वाबळे बेशुद्ध झालेला आहे. त्याला बेशुद्ध अवस्थेमध्ये सुरुवातीला माळेगावच्या स्थानिक डॉक्टरकडे व नंतर भोईटे हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले सदर इसमाची परिस्थिती अजूनही नाजूक आहे सदर घटनेबाबत बारामती शहर पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्याबरोबर तात्काळ तपासाची सूत्रे फिरवून महिला आरोपी सुनिता चव्हाण हिला व मयूर संजय चव्हाण याला तात्काळ अटक करून तीन दिवसाची पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आलेली आहे.
सदरचा प्रकार घडल्यानंतर प्रेमी व प्रेमिका हे पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांनी स्वतःहून सज्ञान असल्याने प्रेमी विवाह केल्याचे सांगितल्याने त्यांनाही संरक्षण देण्यात आली. कायद्यामुळे दोन सज्ञान युवकांचे मिलन झाले परंतु दोन कुटुंब सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी एकमेकांच्या जीवावर उठले. एक जण मरणाच्या दारात आहे तर एक जण आयुष्यभर बंदिस्त जीवन जगण्याच्या मार्गावर आहे.
सदर गुन्हा तात्काळ तपास बारामती शहर पोलीस ठाण्याने करण्याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना आदेश दिल्याने सुनील महाडिक यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील. तसेच तपास पथकाचे सपोनी कुलदीप संकपाळ सीताफ कोळेकर इंगवले तुषार चव्हाण शिंदे यांना आरोपी अटक करण्याबाबत सूचना दिल्याने आरोपी तात्काळ अटक करून तीन दिवस पोलीस कोठडी रिमांड देण्यात आलेली आहे याचा आणखीनही सखोल तपास होणार आहे. जखमीची परिस्थिती नाजूक असली तरी त्यामध्ये सुधारणा होत आहे.
No comments:
Post a Comment