*रयत ग्रीन कॅम्पस प्रशिक्षण श्री छत्रपती शाहू हायस्कूल मध्ये संपन्न* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, November 29, 2022

*रयत ग्रीन कॅम्पस प्रशिक्षण श्री छत्रपती शाहू हायस्कूल मध्ये संपन्न*

*रयत ग्रीन कॅम्पस प्रशिक्षण श्री छत्रपती शाहू हायस्कूल मध्ये संपन्न*
बारामती:- रयत शिक्षण संस्थेच्या क्लायमेट प्रोजेक्ट फाउंडेशन अंतर्गत रयत ग्रीन कॅम्पस प्रशिक्षण शाहू हायस्कूलमध्ये संपन्न झाले या प्रशिक्षणासाठी मा. श्री. गणेश सातव मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते यावेळी  प्राचार्य बी.एन.पवार साहेब यांनी त्यांचे स्वागत पुष्परोप देऊन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅम्पसचे प्रमुख श्री नवनाथ गायकवाड सर यांनी केले मार्गदर्शक गणेश सातव यांनी हवामान बदल ,शास्त्र, परिणाम आणि त्यावरील उपाय याविषयी शालेय स्तरावर आपणास राबविता येण्यासारखे उपक्रम आणि त्यासाठी शाखेतील विद्यार्थी व सर्व शिक्षकांचा सहभाग याविषयी सविस्तर चर्चा केली. यामध्ये हवामानातील बदल, पाणी, ऊर्जा, तापमान वाढ, ढगफुटी  यांचा वेगवेगळ्या परिसंस्थेवर होणारा परिणाम आणि अप्रत्यक्षपणे मानवावर होणारा परिणाम याविषयी मार्गदर्शन केले पुढील पिढ्यांच्या भविष्यासाठी या गोष्टी आवश्यक असून त्याची  माहिती देण्यात आली. या उपक्रमास विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी घेऊन हा प्रोजेक्ट पूर्ण करणे आवश्यक आहे.  या कार्यक्रमात विद्यालयाचे उपप्राचार्य पी. एन. तरंगे पर्यवेक्षक श्री. बी. ए. सुतार सर्व शिक्षक बंधू - भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.जी. गायकवाड यांनी केले तर आभार माननीय प्राचार्य बी.एन पवार साहेब यांनी मानले.

No comments:

Post a Comment