बारामती सब जेल मधील न्यायालयीन बंदी यांना त्यांच्या कायदेविषयक अधिकाराबाबत मार्गदर्शन..
बारामती:- आज दिनांक 2 नोव्हेंबर रोजी बारामती वकील बारासोसिएशन तसेच जिल्हा व विधी सेवा यांच्यातर्फे बारामती सब जेलमध्ये बंदिस्त असलेल्या न्यायालयीन कैद्यास त्यांना असलेले हक्काबाबत तसेच त्यांना आवश्यक असणाऱ्या कायदेविषयक मदती संदर्भात मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले सदर शिबिरात मा.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आतकरे व गिऱ्हे तसेच सरकारी वकील सोनवणे किरण यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये ज्या कायद्यांना न्यायालयामध्ये त्यांची केस चालवण्याची ऐपत नाही किंवा वकिलाला देण्यासाठी पैसे नाहीत त्या कायद्यांनी सदरची बाब न्यायाधीशांच्या लक्षात आणून देऊन त्यांना मोफत कायदेविषयक सल्लागार नेमणे बाबत विनंती केल्यास त्यांना जिल्हा विधिवसेवा यांच्यामार्फत मोफत सरकारी वकील दिला जाईल असे सांगण्यात आले. तसेच त्यांना या सब्जेक्ट मध्ये बंद केलेल्या आहे परंतु त्यांच्या नातेवाईकांना त्याबाबत पोलिसांनी माहिती दिलेली नाही असे कोणाचे प्रश्न आहेत का त्याबाबतही न्यायालयाने विचारणा केली असता कुणीही कायद्यांनी तक्रार केली नाही. तसेच या कोठडीत ठेवण्यामागे कोणत्याही कायद्याला. त्रास देण्याचा न्यायालयाचा उद्देश कधीच नसतो फक्त त्याच्या वर्तणूक मध्ये सुधारणा व्हावी हाच उद्देश असतो त्यामुळे इथून बाहेर पडल्यानंतर प्रत्येकाने चांगले नागरिक बनण्याचा प्रयत्न करावा असेही न्यायाधीशांनी अपील केले. व्यावसायिक पणे गुन्हेगार करणाऱ्या लोकांपासून लांब राहावे अशा बाबत सरकारी वकील किरण सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.शिबिरास एडवोकेट शेरकर अजित ,राजकिरण शिंदे, सोहेल शेख , ऋषिकेश निलाखे हे बारामती वकील संघटनेचे पदाधिकारी तसेच प्रीतम क्षीरसागर ग्रंथपाल वकील संघटना व बारामतीचे विधी व सेवा समितीचे मिलिंद देऊळगावकर हजर होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व जेलर मधुकर जाधव यांनी केले.
No comments:
Post a Comment