लॉजवर नेऊन माजी सरपंचाचं अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार...
पुणे:- महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत असतानाच पुन्हा घृणास्पद कृत्य घडले याबाबत मिळालेली माहिती अशी की,पुणे जिल्ह्यातील एका माजी सरपंचाने एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. संतोष नाझिरकर (वय-40 रा. पुरंदर तालुका)असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे.संतोष नाझिरकर याने पीडित मुलीला लॉजवर घेऊन गेला. या तरुणीने
आपल्यावर होणाऱ्या घटनांची पूर्व कल्पना आपल्या आईला दिली आणि लोकेशन पाठवलं. आईने सतर्क होऊन तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना हा प्रकार सांगितला.पोलिसांनी तात्काळ मुलीने पाठवलेल्या लोकेशनवर जाऊन आरोपीला अटक
केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नाझिरकर आणि पीडित मुलीची व्हॉट्सअॅपच्या
माध्यमातून ओळख झाली होती.चॅटिंग करत दोघांमध्ये चांगली ओळख झाली.त्यानंतर आरोपीने बुधवारी बाहेर जेवायला जाऊ असं सांगत पीडित मुलीला कात्रज येथील एका लॉजवर नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीने घटना घडण्यापूर्वी बाथरुममध्ये जाऊन आईला फोन करुन लोकेशन पाठवले.आईने तातडीने पोलिसांना माहिती
दिली. पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला त्यावेळी
संतोष नाझीरकर याला बलात्कार करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment