रिपब्लिकन नेते आनंदराज आंबेडकरांच्या हस्ते रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांना पुरस्कार! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, November 8, 2022

रिपब्लिकन नेते आनंदराज आंबेडकरांच्या हस्ते रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांना पुरस्कार!

रिपब्लिकन नेते आनंदराज आंबेडकरांच्या हस्ते रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांना पुरस्कार!

मुंबई दि. 8;- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा प्रवेश दिनाचे औचित्य साधून मुंबईतील विश्वशांती सामाजिक संस्थेच्या वतीने रुग्ण हक्क परिषदेचे रुग्णांच्या हक्काच्या जनजागृती विषयी संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारलेल्या कामाची दखल घेऊन संस्थेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांना आदर्श कार्यकर्ता पुरस्कार- 2022 प्रसिद्ध रिपब्लिकन नेते आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते प्रदान करून गौरवण्यात आले. 
      मुंबई भोईवाडा येथे संपन्न झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यामध्ये पुरस्कार्थीसाठी शाल, संविधानाची प्रत, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी मंचावर विश्वशांती सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रतिक कांबळे, शिक्षक मतदार संघाचे आमदार कपिल पाटील, रिपब्लिकन नेते आनंदराज आंबेडकर, रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या वर्षा विद्या विलास, रिपब्लिकन सेनेचे रमेश जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तृतीयपंथी सेलच्या प्रदेशाध्यक्ष प्रियाताई पाटील, भाकर फाउंडेशनचे दीपक सोनावणे, शशिकांत लिंबारे यावेळी प्रमुख उपस्थित होते. 
       यावेळी बोलताना आनंदराज आंबेडकर म्हणाले की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन झाल्याने येथील माणसाला मानवी हक्क मिळाले. स्त्रिया, वंचित, शोषित, कामगार, कष्टकरी जनतेला आपल्या हक्क आणि अधिकारांची जागृती झाली. अनेक महापुरुषांना अभिप्रेत असलेले समता प्रस्थापित करण्याचे कार्य भारतीय संविधानाची निर्मिती करून बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण केले.
        रिपब्लिकन नेते आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झालेले उमेश चव्हाण रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष असून प्रसिद्ध लेखक आहेत, नुकतेच बेस्ट सेलर ठरलेले त्यांचे हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे? हे पुस्तक प्रकाशित झाले असून अल्पावधीतच त्या पुस्तकाची पहिली आवृत्ती देखील संपली आहे.

No comments:

Post a Comment