बारामती प्रशासकीय भवनाला एजंट गिरीचा विळखा...! कारवाई कधी ? - vadgrasta

Post Top Ad

Friday, November 11, 2022

बारामती प्रशासकीय भवनाला एजंट गिरीचा विळखा...! कारवाई कधी ?

बारामती प्रशासकीय भवनाला एजंट गिरीचा विळखा...! कारवाई कधी ?                    बारामती:-माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी करोडो रुपये निधी बारामतीत आणले व त्यातून प्रशस्त भव्य शासकीय इमारती बांधल्या व अजून काही इमारतीचे काम चालू आहे मात्र याच इमारती तील प्रशासकीय भवन ही भव्य इमारत उभी राहिली पण या इमारती अनेक शासकीय कार्यालय आली वेगवेगळ्या विभागाचे या ठिकाणी स्वतंत्र कार्यलय उभे राहिले पण या ठिकाणी कामासाठी येणाऱ्या नागरिकांना मात्र येथे फेलावलेल्या एजंटगिरीला सामोरे जावे लागते मग ते काम करून घेण्यासाठी आर्थिक वजन असो अथवा टक्केवारी असो ही द्यावीच लागते, याला अनेकजण बळी पडले आहेत,पालखी मार्गातील टक्केवारी असो, नोंदीसाठी असो, विविध दाखले काढण्यासाठी असो की रेशनकार्डसाठी असो, की  जमीन खरेदीविक्री चे सहाय्यक निबंधक कार्यालयचे ठिकाण  असो,की सातबारा, फेरफार चे कागदपत्रे काढण्यासाठी असो एजंट गिरी करणारे येथे कमी नाहीत अशी माहिती कळतेय याबाबत वरीष्ठ अधिकारी यांना सांगितले तरी याकडे काना डोळा केला जातो त्यामुळे कोणी पुढे येत नाही व या एजंट गिरीचे फावते तसेच धक्कादायक मिळालेली माहिती म्हणजे या एजंट कडून टक्केवारी दिली जाते असेही समजते यामुळे जनतेची कशी लूट होतेय हे लवकरच सविस्तर प्रसिद्ध करणार आहोत.परंतु अश्या एजंट वर कारवाई होणार का?अशी प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे.

No comments:

Post a Comment