बारामती कराटे क्लबचें मोहित बेलदार, उमर खान,रेवा भारकड सब ज्युनिअर राष्ट्रीय कराटे स्पर्धा निवड..
बारामती:- कराटे दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर कराटे अजिंक्य पद स्पर्धेचे आयोजन ५ व ६ नोव्हेंबर २०२२ रोजी विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा, औरंगाबाद येथे करण्यात आले आहे.
सदर राज्य स्पर्धेतील सवर्ण पदक विजेते मोहित बेलदार, उमर खान,रेवा भारकड बारामती कराटे क्लबचें खेळाडू ३ व ४ डिसेंबर २०२२ रोजी तालकटोरा स्टेडियम, दिल्ली येथे होणार्या अखिल भारतीय सब ज्युनिअर कराटे अजिंक्यपद, २०२२ स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.
तसेच शौर्य खंडाळे - सिल्व्हर मेडल व रियाश सिकची - ब्रॉंझ मेडल मिळवून यश संपादन केले आहे.या सर्व यशस्वी खेळाडूना मास्टर मिननाथ रमेश भोकरे यांचे मार्गदर्शन लाभले.
हि स्पर्धा कॉमन वेल्थ कराटे फेडरेशन (CKF), साऊथ एशियन कराटे फेडरेशन (SAKF), वर्ल्ड कराटे फेडरेशन (WKF) व इंटरनॅशनल ऑलिंपिक कमिटी (IOC) यांच्याशी संलग्न असलेल्या कराटे इंडिया ऑर्गनायझेशन(KIO) मान्यतेने संपन्न झाली.
No comments:
Post a Comment