*संविधानच्या सन्मानार्थ दिव्यांगांची बाईक रॅली*
पिंपरी चिंचवड:- भारतीच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करत असताना संविधानाला विशेष महत्व आहे. संविधानातील सर्वसमावेशक मूल्यांमुळे समाजातील शेवटच्या घटकालाही आज न्यायाची वागणूक मिळते. संविधानामुळे सर्वच नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तसेच प्रत्येकाला आपले विचार मुक्तपणे व्यक्त करता येतात. त्यामुळे संविधानाच्या जनजागृतीेसाठी संविधान दिनानिमित्त पिंपरी चिंचवड परिसरातील दिव्यांगांच्या पुनर्वसन क्षेत्रात कार्यरत असलेल्या संयुक्त दिव्यांग हक्क सुरक्षा समिती,उडान दिव्यांग फाउंडेशन,अपंग सहारा संस्था,नवा सोबती अपंग संस्था या संस्था-संघटनेच्या संयुक्त विद्यमाने संविधान सन्मान बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
रॅलीची सुरुवात भक्तीशक्ती चौक निगडी येथून झाली.एच ए कॉलनी,पिंपरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यापर्यंत आल्यावर डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन रॅलीचा समारोप करण्यात आला.
यावेळी मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.शमशुद्दीन तांबोळी, सहकार्यवाह नवाब अल्तापहुसेन, राष्ट्रीय एकात्मता समितीचे निमंत्रक नितीन पवार, युनिक एज्युकेशनल फाऊंडेशनच्या अध्यक्ष सुरेखा माने,कृष्णवत्सल फाउंडेशनचे अध्यक्ष धर्मेंद्र सातव, फ्रिडम लाईफ फाउंडेशनच्या विजया भामरे, ज्योती आवटे, वैशाली पवार, सविता नांद्रे,अभिसार फाउंडेशनचे रमेश मुसुडगे, संयुक्त दिव्यांग हक्क सुरक्षा समितीचे हरिदास शिंदे, सचिन तुरुकमारे, उडान दिव्यांग फाऊंडेशनचे आनंद बनसोडे, सहारा अपंग संस्थेचे अशोक सोनवणे, नवा सोबती अपंग संस्थेच्या नविना खंडागळे, धनंजय कांबळे याचेसह बहुसंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमात सुरुवातीला संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. सत्रसंचालन हरिदास शिंदे यांनी केले,डॉ. शमशुद्दीन तांबोळी तसेच श्री. नितीन पवार यांनी भारतीय संविधानातील मूल्यांवर आपले विचार मांडले.धर्मेंद्र सातव यांच्या हस्ते संविधानाची पुस्तके तसेच संविधानाच्या प्रस्ताविकेच्या प्रती वितरण केल्या,आनंद बनसोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. शेवटी राष्ट्रगीत झाले. त्यानंतर फ्रिडम लाईफ फाऊंडेशनच्या बचत गटाने सहभागी दिव्यांगांच्या अल्पपहाराची तर अभिसार फाउंडेशन कडून पाण्याची व्यवस्था केली होती.
रॅली यशस्वी करण्यासाठी केशव कळसकर, बालाजी मोरे,रवी भिसे, नागेश काळे, विजय शिंगे, सतीश थोरात, सज्जू ,कल्लप्पा नायडू यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment