परिचारिकांना सरकारचं गिफ्ट;कोविड काळात काम केलेल्यांना आरोग्य विभागाच्या सेवेत कायम करण्याचा निर्णय..!
मुंबई :- जीवाची बाजी लावून या परिचारिकांनी कोविडच्या काळात लोकांची सेवा केली त्या कोविड काळात कंत्राटी पद्धतीनं काम
करणाऱ्या परिचारिकांना शासनानं मोठं दिलासा दिला आहे. ५९७ परिचारिकांची कायमस्वरुपी शासकीय सेवेत नियुक्ती होणार आहे. आरोग्य विभागानं हा मोठा निर्णय घेतला आहे.कोविडच्या काळात आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण
आल्यानं मोठ्या प्रमाणावर परिचारिकांची तात्पुरत्या स्वरुपात भरती करण्यात आली होती. यांपैकी ५९७ परिचारिकांना कायमस्वरुपी सेवेत घेण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे.
या परिचारिकांना कोविड काळात ११ महिन्यांच्या
कंत्राटी कामावर घेण्यात आलं होतं. पण कोविडचा संसर्ग कमी झाल्यानंतर त्यांचा करार पुन्हा वाढवण्यात आला होता. पण यानंतर त्यांना सेवेतून पायउतार व्हावं लागणार होतं. या परिचारिकांनी अनेकदा मागणी देखील केली होती की आम्हाला कायमस्वरुपी सामावून
घ्या.जीवाची बाजी लावून या परिचारिकांनी कोविडच्या काळात लोकांची सेवा केल्यानं केंद्राची परवानगी घेत राज्य शासनानं या परिचारिकांना राज्य शासनाच्या सेवेत कायम करण्याचा निर्णय घेतला.
No comments:
Post a Comment