महसूल विभागात नक्की चाललंय तरी काय, एकदा नव्हे दोनदा लिपीक लाच घेताना ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात.. लातूर(प्रतिनिधी) : - लाच घेणाऱ्याचे प्रमाणात वाढ होत असल्याने कारवाई देखील तेवढ्याच होत आहे वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी, कर्मचारी लाच घेताना सापडले आहे अशीच एक घटना घडली ती ही एकदा नव्हे दोनदा याबाबत माहिती अशी की,जामिनासाठी लागणारे सॉल्व्हन्सी (ऐपतदारी प्रमाणपत्र) काढून देण्यासाठी उदगीर तहसिल कार्यालयातील
महसूल लिपिकाला दोन हजार रुपये लाच घेताना
लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि. 11) महसूल विभागाच्या कार्यालयात करण्यात आली. प्रशांत अंबादासराव चव्हाण (वय-48) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या महसूल सहायकाचे (लिपिक) नाव आहे.विशेष म्हणजे प्रशांत चव्हाण यांच्यावर 2016 साली लातूर एसीबीने कारवाई केली होती. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून चव्हाण याला दुसऱ्यांदा लाच घेताना पकडल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत 28 वर्षाच्या तक्रारदाराने लातूर एसीबीकडे गुरुवारी (दि. 10) तक्रार केली.तक्रारदार यांचे भाऊजीवर गुन्हा दाखल आहे.या गुन्ह्यात तक्रारदारांचे भाऊजीच्या जामीना करीता सॉल्व्हन्सी लागणार होती. भाऊजींच्या वडीलांच्या नावे सॉल्व्हन्सी काढण्यासाठी तक्रारदार यांनी प्रशांत चव्हाण यांच्याकडे अर्ज केला होता. चव्हाण यांनी
सॉल्व्हन्सी काढून देण्याच्या कामासाठी दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी लातुर एसीबीकडे तक्रार केली. लातुर एसीबीच्या युनिटने पंचासमक्ष पडताळणी केली
असता लिपिक प्रशांत चव्हाण याने दोन हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार शुक्रवारी उदगीर तहसिल कार्यालायातील महसूल विभागात सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपये लाच घेताना प्रशांत चव्हाण यांना ताब्यात घेण्यात आले. याबाबत उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे अपर पोलीस अधिक्षक धरमसिंग चव्हाण,लातूर एसीबीचे पोलीस उप अधीक्षक पंडीत रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भास्कर
पुल्ली,पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर यांच्या पथकाने केली.
No comments:
Post a Comment