बापरे..व्हॉट्स अँप द्वारे चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा झाला पर्दाफाश,दोन मुलींची सुटका तर एजंट अटक..!
पुणे : –वेश्याव्यवसाय वाढत असताना कोणी सहमतीने तर कोणी दबावाखाली वेश्या व्यवसाय करीत असल्याचे उघड झाले आहे, नुकताच
व्हॉट्सअँपच्या माध्यमातून चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या
सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे.या कारवाईत परराज्यातील दोन मुलींची सुटका करण्यात आली. तर एजंटला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई खराडी परिसरातील लॉजमध्ये करण्यात आली. परराज्यातील मुलींना व्हॉट्सअँप द्वारे संपर्क करुन त्यांना जास्तीच्या पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी पुण्यात बोलावून घेऊन त्यांना वेश्याव्यवसायाकरीता पुरवले जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली.पोलिसांनी या गुन्ह्यातील एजंटच्या नंबरची माहिती मिळवली. पथकाने बनावट ग्राहकाकडून एजंटला फोन करुन मुलींबाबत विचारणा केली. एजंटने खराडी परिसरातील लॉजमध्ये दोन रुम बुक करण्यास सांगितले. त्यानुसार पोलिसांनी बनावट
ग्राहकाच्या नावाने दोन रुम बुक केल्या. काही वेळाने एकजण दोन मुलींना दुचाकीवरुन घेऊन आला. त्याने दोन मुलींना सोडल्यानंतर पोलिसांनी एजंटला ताब्यात घेतले. तर बनावट ग्राहकाच्या रुममध्ये मुली गेल्यानंतर छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या दोन मुलीपैकी एक जण मध्य प्रदेश तर दुसरी उत्तर प्रदेशातील आहे. अटक करण्यात आलेल्या एजंटवर आणि त्याच्या इतर दोन साथिदारांवर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चंदननगर पोलीस करीत आहेत.
No comments:
Post a Comment