बारामतीत उद्योग व्यापार विषयक मार्गदर्शन मेळावा संपन्न
उद्योग व्यवसाय मार्गदर्शक पी.टी.काळे यांनी केले मार्गदर्शन
बारामती :- उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी व वाढीसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन महिलांनी,तरुणांनी, शेतकऱ्यांनी,व्यापाऱ्यांनी आपली आर्थिक उन्नती साधली पाहिजे. सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यापार-उद्योग स्थापन करावा असे आवाहन उद्योग व्यवसाय मार्गदर्शक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य पी.टी.काळे यांनी केले.
उद्योग व व्यापार विभागाचे बारामती शहराध्यक्ष वैभव शेठ शिंदे यांनी बारामती बाजार समिती येथील अजित सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत काळे बोलत होते.
यावेळी बाजार समितीचे मा.सभापती विठ्ठल खैरे,मा. उपसभापती दत्तात्रय सणस,बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप,उद्योजक भारत नाना जाधव ,बारामती तालुका सोशल मिडियाचे अध्यक्ष सुनिल बनसोडे,शहर अध्यक्ष तुषार लोखंडे,प्रमुख व्यापारी प्रमोद खटावकर,प्रमोद काकडे,अनिल काळे,अशोकराव तावरे, नितीन तुपे,राजेंद्र खराडे,शरद मचाले,वैभव कापसे, रघुनाथ दाभाडे, प्रविण दाभाडे,सतीश गावडे, आदींसह व्यापारी, उद्योजक तसेच विविध संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या कक्षेतील महिलांच्या हाताला काम देण्यासाठी महिलांना गृह उद्योग,तरुणांसाठी लघुउद्योग तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी काय उपाय करता येतील. बारामतीत विविध उद्योगासाठी बाहेरून येणारा माल बारामती मध्येच तयार करता येईल का यासह बारामतीचा उद्योग व व्यापार क्षेत्रात झालेल्या विकासात आणखी वाढ करून अधिकच्या सुविधा कशा वाढवता येतील याबाबत काळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment