खून प्रकरणी कांबल्या आणि सोल्जर वर पोलिसांत गुन्हा दाखल..
बारामती:- बारामती तालुक्यातील निंबुत येथे केंज्या कठीन काळे वय ४० रा. निंबुत पठारवस्ती ता. बारामती यांच्या खून प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी दोघांवर गुन्हा
दाखल केला आहे.याबाबत कठीण बबलु काळे वय ६८ वर्षे धंदा मजुरी रा निंबुत पठारवस्ती ता. बारामती यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यावरून पोलिसांनी कांबल्या उर्फ कमलाकर नथ्या भोसले रा.गरदडवाडी ता. बारामती जि.पुणे व याचा जावई 2 )सोल्जर जेल्या पवार रा. काळज ता. फलटण जि.
सातारा या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
दि. 25/11/2022 रोजी सायंकाळी 19/00
वा. चे दरम्यान ते आज दिनांक 26/11/2022 रोजी सकाळी 6/00 वा. चे दरम्यान मौजे निंबुत ते पठारवस्ती रोडचे कडेचे चारीचे पाण्यात एक मृतदेहआढळून आला.यातील आरोपी क 1 व 2 यांनी संगनमताने फिर्यादीचा मुलगा केंज्या कठीन काळे वय 40 वर्षे, रा.निंबुत पठारवस्ती ता. बारामती जि. पुणे यास आरोपी क्र 2 याने फिर्यादीचा नातु शंभु सतीश काळे याची
बायको निशा शंभु काळे हिचे बरोबर लग्न करावयाचे आहे असे म्हणत असल्याने त्यास यातील फिर्यादीचा मुलगा केंज्या कठीन काळे व नातु शंभु सतीश काळे हे विरोध करीत असल्याचे कारणावरुन आरोपी क 1व 2 यांनी यातील फिर्यादीचा मुलगा केंज्या कठीन काळे
वय 40 वर्षे, रा. निंबुत पठारवस्ती ता बारामती जि.पुणे यास त्याचा खुन करण्याचे उददेशाने त्यास दगडाने अगर कोणत्यातरी घातक हत्याराने त्याचे डोकीत किरकोळ व गभीर जखमा करुन त्याचा खुन करुन पुरावा नष्ट करण्याचे उददेशाने त्याचे प्रेत राहुल शामलाल काकडे यांचे शेताचे रोडलगत असलेल्या कमी पाणी असलेल्या चारीत टाकुन दिले आहे वगैरे मजकुरचे फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टरी दाखल केला
असुन सदर गुन्हयाचा प्रथमवर्दी रिपोर्ट मे हुए कोर्टास पाठविणेत आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास सपानि सोमनाथ लांडे हे करीत आहेत.
No comments:
Post a Comment