बारामती:-भारताचे माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू (चाचा) यांच्या वाढदिवसानिमित्त 14 नोव्हेंबर 2022 रोजी बालदिन संपुर्ण भारत देशामध्ये साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून कारभारी आण्णा चॅरिटेबल फाऊंडेशन संचलित के.ए.सी.एफ. इंग्लिश मिडीयम स्कुल येथे शाळेतील बालगोपाळांसोबत ‘‘बालदिन’’ अत्यंत उत्साहपुर्वक वातावरणामध्ये साजरा करण्यात आला.
याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी फनी गेम्स, विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन बालदिनाचा आनंद द्विगुणीत केला. सदरवेळी शाळेतील शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी यांनीदेखील सहभाग घेऊन रस्सी खेच, क्रिकेट, संगीत खुर्ची, बकेट बॉल, तळ्यात-मळ्यात असे फनी गेम्स खेळले व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचा-यांच्या फनी गेम्स चे पंच व परिक्षक म्हणुन बालदिना निमित्त विद्यार्थ्यांनी जबाबदारी पार पाडली व विशेष बाब म्हणजे या सर्वच कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांनी केले होते.
बालगोपाळांना संस्थेचे सचिव श्री. प्रशांत (नाना) सातव यांनी बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणुन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 25 वर्षाखालील संघाचे फिटनेस कोच श्री. विनोद यादव सर, शाळेच्या विश्वस्त सौ. शुभांगी प्रशांत सातव, मुुख्याध्यापिका सौ. नाजनीन शेख, श्री. सचिन माने, श्री. इकबाल तांबोळी, योगेश डहाळे यांच्या हस्ते बालगोपाळांना खाऊचे वाटप व विविध खेळातील विजेत्यांना सन्मानचिन्ह वाटप करण्यात आले. बालदिनामुळे शाळेमध्ये अतिशय उत्साहाचे व चैतन्यपुर्ण वातावरण पहावयास मिळाले.
No comments:
Post a Comment