श्री वाघेश्वरी विद्यालयात "संविधान दिन" प्रभात फेरी, विविध स्पर्धा तसेच वेगवेगळे उपक्रम राबवून उत्साहात साजरा...
निरावागज:- येथील श्री वाघेश्वरी विद्यालयात आज "संविधान दिना" निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले. त्यामध्ये प्रामुख्याने संविधान रॅली, वक्तृत स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, यांसोबत अनेक उपक्रम शाळेत राबवण्यात आले. यावेळी कार्यक्रमाची सुरवात संविधानाचे वाचन करून करण्यात आली.
संविधान रॅलीत संविधानाचा जयघोष करणाऱ्या घोषणा, संविधानातून मिळणाऱ्या अधिकारांचे पोस्टर हातात घेवून गावांतील मुख्य चौकातून प्रभात फेरी काढून गावभर जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमात आजी माजी विद्यार्थ्यांसोबत ग्रामस्थांनीही उत्साहाने सहभाग घेतला. विद्यालयाचे मुख्याध्यापक जी.आर बुरुंगले सर आणि पर्यवेक्षक वाघमोडे सर यांनी कार्यक्रम अधिक प्रभावशाली करण्यासाठी खुप प्रयत्न केले. "इथून पुढे प्रत्येक वर्षी "संविधान दिन" याच उत्साहाने अनेक उपक्रम राबवून साजरा केला जाईल, असे मुख्याध्यापकांच्या वतीने चोपडे सर यांनी सांगितले". अशी माहिती सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे बारामती तालुका अध्यक्ष रोहित भोसले यांनी दिली.
No comments:
Post a Comment