धक्कादायक..सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांच्या मुलाचा प्रताप,मैत्रिणीचे न्यूड फोटो,अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियाच्या पॉर्नसाईटवर केले अपलोड..!
पुणे :- कोण काय करेल व कोणत्या थराला जाईल याचा नेम नाही, प्रेमसंबंध पुढे सुरु ठेवण्यास नकार दिल्याने सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्ताच्या मुलाने मैत्रिणीचे न्यूड फोटो, अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर बनावट खाते तयार करुन पॉर्नसाईटवर अपलोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला
आहे.याबाबत लोणी काळभोर पोलिसांनी अमेय अनिल दबडे (रा. टिळेकरनगर, कोंढवा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका २५ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार मार्च ते सप्टेबर २०२२ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व अमेय दबडे हे कोकणातील कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. पुण्यात आल्यावर तरुणीने त्याच्यासमवेत प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. तिचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली.
त्याला तिने नकार दिला. दबडे याला या तरुणीच्या सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामचा आयडी व पासवर्ड माहिती होता. त्याने तिच्या इन्स्टाग्रामच्या खात्यावर तिचे न्यूड फोटो पाठवले. अमेय याने तिच्या नावे बनावट पॉर्नसाईटवर खाते तयार केले. त्यावर तिचे
न्यूड फोटो व अश्लिल व्हिडिओ अपलोड केले. तिच्या या तरुणीचा मोबाईल क्रमांक त्या पॉर्न साईटवर अपलोड केल्यानंतर तिला फोनवर अश्लिल भाषेत लोक संवाद साधू लागले. तेव्हा हा प्रकार तिच्या लक्षात आला. तिने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.त्यांनी पुढील तपासासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली असून पोलीस निरीक्षक
काळे अधिक तपास करीत आहेत. आरोपी दबडे याचे वडिल एसीपी म्हणून पोलिस खात्यातून काही महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाल्याचे पोलिसांनी सांगितले.या बातमीमुळे सर्वत्र खळबळ उडाली.
No comments:
Post a Comment