खळबळजनक..पोलीस उपनिरीक्षकाला पत्नीचा छळ केल्या प्रकरणी शिक्षा व दंड, न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, November 11, 2022

खळबळजनक..पोलीस उपनिरीक्षकाला पत्नीचा छळ केल्या प्रकरणी शिक्षा व दंड, न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल..

खळबळजनक..पोलीस उपनिरीक्षकाला पत्नीचा छळ केल्या प्रकरणी शिक्षा व दंड, न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल..

पुसद:- वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ग्रीन पार्क येथे राहणारे पोलीस उपनिरीक्षक व त्याच्या मंडळीकडून विवाहितेला मानसिक व शारीरिक छळ करत होते. सासरच्या जाचाला कंटाळून पीडीत विवाहितेने वसंत नगर पोलीस स्टेशनमध्ये पती व सासरच्या मंडळी विरोधात तक्रार दिली होती.त्या तक्रारीच्या आधारे विविध कलमाने गुन्हे दाखल करण्यात आले होते. प्रकरण नंतर न्यायालयात गेल्याने न्यायालयाने पोलीस उपनिरीक्षकाला दि. ९ नोव्हेंबर २०२२ रोजी दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर पोलीस
उपनिरीक्षकाला दोषी आढळल्याने शिक्षा व दंड
ठोठावला आहे. पुसद न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण
 निकालाने पोलीस वर्तुळात एकच चर्चेला उधाण
आले आहे.प्रकरणाची थोडक्यात माहीती अशी की,फिर्यादी मोनीकाचे लग्न यवतमाळ येथे राहणारे पोलीस उपनिरीक्षक भारत उत्तमराव लसणते यांच्या सोबत दि. २६ डिसेंबर २०१५ रोजी रितीरिवाज प्रमाणे झाला होता. त्यानंतर
मोनीकाला तिचा पती व सासरच्या इतर कुटुंबियांनी विविध कारणावरून शारीरीक व मानसीक छळ करण्यास सुरुवात केली होती.फिर्यादीने पोलीस स्टेशन वसंत नगर पुसद येथे रितसर तक्रार दिली होती. त्यावरून तिचा पती भारत व त्यांचे इतर कुटूंबिय यांचे विरूध्द सन २०१७ ला कलम ४९८अ, ३२३, ५०४, ५०६ सह ३४ भा. द. वी नुसार गुन्हाची नोंद झाला होता. ते प्रकरण पुसद येथील फौजदारी न्यायालयात वर्ग करण्यात आले होते. सदर प्रकरणात फिर्यादीने सरकारी वकीलासह पुसद येथील विधीज्ञ अॅड.नय्यर खान कौसर खान यांची सुध्दा खाजगी वकील म्हणुन न्यायालयाच्या परवानगीने नियुक्ती केली होती. सदर प्रकरणात फिर्यादी पक्षाच्यावतीने फिर्यादी यांचे सह एकुण ५ साक्षीदार तपासण्यात आल्या.त्यानंतर उभय पक्षांचा युक्तीवाद होवून वि. न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी जी. एस. वर्पे यांच्या कोर्ट नंबर पाचमध्ये दि. २१ ऑक्टोंबर २०२२ रोजी अंतीम आदेश पारीत करून सदर गुन्हातील आरोपी पती भारत लसणते यास सदर गुन्हात दोषी ठरवून १ वर्षाची शिक्षा व पाच हजार रुपये दंडासह, कलम ३२३ मध्ये सहा महीन्याची शिक्षा व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. यातील इतर आरोपी यांना संशयाचा फायदा देवून दोष मुक्त केले आहे.सदर आदेशामुळे संपुर्ण परीसरात व पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणात शिक्षा झालेला आरोपी पती हा सध्या जिल्हा पोलीस मुख्यालय वाशीम येथे पोलीस उपनिरीक्षक पदी कार्यरत आहे. सदर प्रकरणात फिर्यादीच्या वतीने सरकारी वकील यांना
फिर्यादीचे खाजगी वकील अॅड. नय्यर खान
कौसर खान यांनी मोलाचे सहकार्य दिले होते हे
विशेष.

No comments:

Post a Comment