पुरवठा विभागाचा निरीक्षण अधिकारी एसीबीच्या ताब्यात, शिवभोजन थाळीची थकीत रक्कम मिळण्यासाठी मागितली होती लाच.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, November 25, 2022

पुरवठा विभागाचा निरीक्षण अधिकारी एसीबीच्या ताब्यात, शिवभोजन थाळीची थकीत रक्कम मिळण्यासाठी मागितली होती लाच..

पुरवठा विभागाचा निरीक्षण अधिकारी एसीबीच्या ताब्यात, शिवभोजन थाळीची थकीत रक्कम मिळण्यासाठी मागितली होती लाच..                                                   वाशिम:–लाच लुचपत विभागाच्या कारवाईत वाढ होत असताना नुकताच एक कारवाई करण्यात आली याबाबत सविस्तर असे की, शिवभोजन थाळी केंद्राचे थकीत देयक मिळण्यासाठी पुरवठा विभागातील निरीक्षण अधिकाऱ्याने 80 हजार लाच मागून 70 हजार लाच स्वीकारल्याचा प्रकार वाशिममध्ये घडला आहे.त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत लाचखोर निरीक्षक आणि त्याचा साथीदार दोघांना ताब्यात घेतले आहे.विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांच्या मित्राला शिवभोजन थाळीचे कंत्राट मिळाले आहे. या दोघांची काही रक्कम थकबाकीत आहे.त्यासाठी त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी
कार्यालयासोबत पाठपुरावा केला. पण त्यांचे देयक पुढे पाठविण्यासाठी आरोपी लोकसेवक निलेश विठ्ठलराव राठोड (वय - 33 ) यांनी 80 हजार रुपयांची लाच मागितली. या प्रकाराची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला देण्यात आली आणि विभागाने त्यानुसार सापळा रचत कारवाई केली. दि. 25 नोव्हेंबर रोजी लाचखोर राठोड यांचा माणूस अब्दुल अकिब ( वय - 25, रा. सौदागर पुरा जैन मंदिर जवळ वाशिम) याने राठोड यांच्या वतीने तक्रारदार आणि त्यांच्या मित्राकडून प्रत्येकी 35 हजार प्रमाणे एकूण 70 हजार लाच पंचासमोर स्वीकारली.त्याचवेळी सापळा पथकाने दोघांना ताब्यात घेतले.आहे. दोनही आरोपींच्या विरोधात वाशिम शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे.सदर कारवाई पोलीस अधिक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत,देविदास घेवारे आणि पोलीस उपअधीक्षक संजय महाजन, शिवलाल भगत पोलीस निरीक्षक अमोल कडू,योगेशकुमार दंदे यांच्यासह पोलीस नाईक विनोद कुंजाम, पोलिस शिपाई शैलेश कडू आणि चालक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बारबुद्दे यांनी केली.

No comments:

Post a Comment