'संविधान दिन' उत्साहात साजरा करा सम्यकचे निरावागज च्या मुख्याध्यापकांना निवेदन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, November 22, 2022

'संविधान दिन' उत्साहात साजरा करा सम्यकचे निरावागज च्या मुख्याध्यापकांना निवेदन..

'संविधान दिन' उत्साहात साजरा करा सम्यकचे निरावागज च्या मुख्याध्यापकांना निवेदन..

 निरावागज:- श्री वाघेश्वरी विद्यालय, निरावागज चे मुख्याध्यापक बुरूंगले सर यांना ''संविधान दिन'' शाळेमध्ये विविध उपक्रम राबवून उत्साहात साजरा करावा यासाठी सम्यकच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय काढून "संविधान दिन" शाळांमध्ये कसा साजरा करावा हे त्या परिपत्रकांमध्ये नमूद केले आहे. त्यालाच अनुसरून सम्यक विद्यार्थी आंदोलन च्या वतीने शाळेला या निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली.
       शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांना घेवून गावातील प्रत्येक चौकातून संविधानाची जनजागृती करणारी, संविधानाने सामान्य नागरिकांना, महिलांना, कामगारांना दिलेले हक्क त्यांचे पोस्टर हातात घेवून "संविधान रॅली" काढण्यात यावी. ५वी ते १०वी पर्यंत च्या सर्व विद्यार्थ्यांना संविधान या विषयावर निबंध द्यावेत तसेच संविधानावर वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धांचे आयोजन विद्यालयात करण्यात यावे असे त्यांना निवेदनासोबत सांगण्यात आले.
        "संविधान दिन" हा आपल्या सर्वांचा "राष्ट्रीय उत्सव" असून तो आम्ही अधिक उत्साहात साजरा करण्याचा प्रयत्न करू असे शाळेचे मुख्याध्यापक श्री. बुरुंगले सर यांच्याकडून सांगण्यात आले.
         यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री बुरुंगले सर, पर्यवेक्षक वाघमोडे सर, चोरमले सर, चोपडे सर, पाटील मॅडम तसेच सम्यकचे बारामती तालुका अध्यक्ष रोहित भोसले, ऋषिकेश भोसले, कृष्णा भोसले, आदित्य भोसले, पंकज भोसले तसेच आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment